5 कोटी रुपये साठी (13) वर्षे पिडीत अपहरण झालेल्या शाळकरी मुलाची 8 तासात सुटका


 3 अपहरण कर्त्यांना स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे सदर बाजार जालना कडुन अटक

जालना, दि. 26: दिनांक 25/06/2024 रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान फिर्यादी नामे कष्णा पिता गोपीनाथराव मुजमले, वय ३८वर्षे व्यवसाय व्यापार, राहणार पुष्कर हॉस्टिपल समोर, अमरछाया टॉकीजजवळ, नविन जालना यांचा तेरा वर्षीय मुलगा त्यांचे राहते घरातुन सायकलवर नारायणा इ-टेक्नो या शाळेत निघुन गेला. सकाळी ११.०० वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांचे मोबाईल फोन वर अज्ञात व्यक्तीने फोन करुन सांगीतले की, तुमचा मुलगा आमचे ताब्यात आहे. त्यास सुखरुप परत पाहीजे असल्यास संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान देवमुर्ती येथे पाच करोड रुपये घेवुन येवुन रक्कम देवुन मुलगा परत घेवुन जा. काही हलचाल केली तर मुलास एडस् स्टेराईडस चे इंजेक्शन देवु अशी धमकी दिली होती. सदर बाब फिर्यादीने तात्काळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना सांगीतली. मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना पाचारण करुन सदर प्रकरणांबाबत माहीती देवुन मुलाचा शोध सुचना व मार्गदर्शन केले.

 पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी / अंमलदार तसेच सदर बाजार जालना येथील पोलीस अधिकारी अमंलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन आरोपी कडील मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन पथकास योग्य सुचना व मार्गदर्शन करुन पथकासह मुलाचा शोध कार्यकामी रवाना झ गाले. अपहरण झालेल्या मुलाचे वडीलास सोबत घेऊन आरोपीतां सोबत वेळोवेळी संभाषण चालु ठेवले. आरोपीतांनी वारंवार पाच कोटी, तीन कोटी अशी पैशाची मागणी करुन रात्री आठ वाजता पैशाची बॅग कन्हैयानगर येथील रिलायन्स पेट्रोलपंपाचे मागे ठेवण्यास सांगितले. ठरल्या प्रमाणे पोलीसांनी सदर ठिकाणी व परिसरात सापळा लावुन पैसे घेऊन जाण्यासाठी घेऊन आलेला आरोपी नामे रोहित राजा भुरेवाल रा. पुष्कर हॉस्पीटल समोर जालना यास शिताफीने पकडले. त्यास ताब्यात घेऊन सखोल विचारपुस करुन इतर दोन आरोपी नामे अरबाज अवकर शेख रा. उडपी हॉटेल जवळ टांगा स्टॅण्ड जालना व वरुन नितीन शर्मा रा. गायत्रीनगर नवीन जालना अशा तिन आरोपीतांना बारीबारीने वेगवेगळ्या ठिकाणाहुन ताब्यात घेऊन त्यांचे ताव्यातील ओमनी गाडीतील अपहरण झालेला तेरा वर्षीय मुलगा सुखरुप ताब्यात घेतला. नमुद तिन्ही आरोपीतां कडुन एक ओमनि कार, एक अपाची मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीतां विरुध्द फिर्यादी यांनी पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे फिर्याद दिल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा रजि नं ७१६/२०२४ कलम ३७०,३६३,३६४,३६४ (अ), १२० (ब), ३२३, ५०६, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि नरोडे पोलीस ठाणे सदर बाजार हे करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सदर बाजार पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्ष पंकज जाधव, सहा. पो. निरी. शांतीलाल चव्हाण, पोउपनि राजेंद्र वाघ, पोउपनि श्री. नरोडे, पोहवा सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, विनायक कोकणे, कृष्णा तंगे, विजय डिक्कर, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर, गोपाल गोशिक, सतिष श्रीवास, योगेश सहाने, धिरज भोसले, शेख अजिम चापोउपनि संजय राऊत यांनी केली आहे.