मलकापूर येथील तुलसी नगर भाग-२ या ठिकाणी मित्राच्या रुमवर नेऊन एका २३ वर्षीय विवाहितेवर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना २० मार्च रोजी उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून तिन्ही आरोपींना अटक करीत आज न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने २६ मार्चपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पळसखेड सपकाळ ता. चिखली येथील एक २३ वर्षीय महिला दोन युवकांच्या संपर्कात आली. त्यानंतर त्या दोघांनी त्या विवाहितेस आपल्या मोटरसायकलवर बसून मलकापूर येथे तुलसीनगर येथील एका खोलीवर १९ मार्च रोजी आणले. यावेळी त्याठिकाणी सुरज पंढरी शेवाळे (वय ३०) रा. मेहकर, विशाल भगवान शेवाळे (वय ३३) रा.मेहकर, आकाश संजय शेजूळ (वय २५) रा. वडगाव लोणार या तिघांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.
सकाळी पिडीत युवती खोलीच्या बाहेर पडली असता घर मालकाने पिडीत युवतीची चौकशी केली. तेव्हा तिला काही सुचतच नसल्यामुळे घर मालकाने २० मार्च रोजी सकाळी पोलिसांना माहिती दिली. यावेळी मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी, पोलिस निरीक्षक अनिल गोपाळ हे घटनास्थळी दाखल झाले. तर पीडित युवतीला उपचारासाठी रूग्णालयात दखल करण्यात आले. या दरम्यान पीडित महिलेने भावासह पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांना घडलेल्या घटनेची सांगितली. आपबिती पीडित महिलेचे तक्रारी 'वरुन पोलिसांनी आज २१ मार्च रोजी आरोपी सुरज पंढरी शेवाळे, विशाल भगवान शेवाळे, आकाश संजय शेजूळ या तिघांना अटक करीत तिघांविरूध्द अप.नं. ३७/२४ कलम ३६३, ३६६, ३७६, ३७६ (ड) ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर आज २१ मार्च रोजी दुपारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघा आरोपींना २६ मार्चपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली