मनोज जरांगे यांची उद्या श्रीगोंद्यात सभा

 


श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील औटीवाडी  येथील मैदानावर शुक्रवारी (दि.९) सकाळी ८ वाजता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. जरांगे पाटील हे शनिवारपासून (दि.१०) आंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार आहेत. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील श्रीगोंद्याच्या सभेत रणनीती जाहीर करणार आहेत. त्यामुळे श्रीगोंद्याच्या सभेला विशेष महत्त्व आहे.

बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, अशोक खंडके, भारती इंगवले. आरती रणशिंग, दादासाहेब औटी, अंबादास औटी, अनंत लगड, अंकुश घाडगे यांनी सभा होणाऱ्या मैदानाची पाहणी केली, जरांगे पाटील यांचे स्वयंसेवक श्रीगोंद्यात दाखल झाले आहेत.

जरांगे पाटील यांची श्रीगोंद्यातील सभा यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. औटीवाडीच्या १०० एकर जागेत बसण्याची व्यवस्था, मंच २० फूट बाय ३० फूट आकाराचा उभारण्यात आला आहे. पुष्पवृष्टी करण्यासाठी १०० जेसीबी, तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येणार आहे. १०० एकरमध्ये पार्किंग ठेवण्यात आली आहे.