नांदुऱ्यात ४७ वाहन चालकांविरूध्द पोलिसांची दंडात्मक कारवाई

  

नांदुरा (प्रतिनिधी) - नांदुरा शहर पोलिसांनी मोटार सायकलवर स्टंटबाजी करणारे, टवाळखोर तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४७ वाहन चालकांविरुध्द कारवाई करत ३० हजार ५०० रुपये दंडाची आकारण्याची केल्पाची कारवाई आज ३१ जानेवारी रोजी केली याबाबत अधिक माहिती अशी की, नांदुरा पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात चिडीमार पथकाच्या प्रमुख पोउपनि क्रांती ढाकणे, पोकों सुनील सुशीर, श्रीकृष्ण संदुके, नवाज शेख, अनिल धीरबस्सी यांनी नांदुरा शहरातील कोठारी हायस्कूल, ज्ञानपीठ हायस्कूल, शिवाजी हायस्कूल तसेच बस स्थानक परिसरात बाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसह मोटरसायकल वरती स्टंटबाजी करणाऱ्या व टवाळखोरी करणाऱ्यांविरुध्द घडक कारवाईची मोहीम राबविली. या अंतर्गत तब्बल ४७ वाहन चालकांविरुस्द मोटार वाहन कायद्या अंतर्गत कार्यवाही करून ३० हजार ५०० रूपयांचा दंड आकारण्यात आला.

                ३० हजार ५०० रू. दंडाची वसुली

नांदुरा तालुक्यातील नागरिकांनी आपल्या ताब्यातील वहान चालवतांना वाहनांची कागदपत्रे तसेच लायसन्स सोबत ठेवावे. त्याचप्रमाणे आपल्या अल्पवयीन पाल्यांना मोटारसायकल व इतर वाहने चालविण्यासाठी देऊ नये. अन्यथा अल्पवयीन मुलांसह पालकांना देखील कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल. शाळा, कॉलेज, बसस्टँड व शहरात कोणत्याही ठिकाणी टवाळखोरी करताना तसेच स्टंटबाजी करताना आढळून आल्यास त्यांचेवर चिडीमार पथकाडून कारवाई करण्यात येईल.

 विलास पाटील, पोलीस निरीक्षक, नांदुरा