सोमठाण्यात भगरीचा प्रसाद खाऊन 600 जणांना विषबाधा

  

जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात मंगळवारी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर जेवणातून भगर आणि आमटी सर्व भाविकांना देण्यात आली. मात्र, भगर आणि आमटी जेवल्यानंतर गावातील जवळपास सर्वांनाच उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. अंदाजे 500ते 600  जणांना या जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाली असून, या सर्वांवर बिबी, लोणार, मेहकर, सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.व काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुलतानपूर येथे काही लोकांना ऍडमिट करण्यात आले आहे अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. 

लोणार तालुक्यातील सोमाठाना गावात एका धार्मिक कार्यक्रमात भगर व आमटी जेवल्यानंतर जवळपास 500 जणांना विषबाधा झाली होती. यासर्व गावकऱ्यांवर विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील 100 ते 120 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर अद्यापही 400 जणांवर उपचार सुरू आहेत. यातील काही वृद्ध नागरिकांची प्रकृती गंभीर आहे. रात्री विषबाधेच्या प्रकारानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स गैरहजर असल्याने गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे