प्रवीण बरडे माहूर (प्रतिनिधी)
तालुक्यामध्ये घरकुलाची काम रेती अभावी रखडले असून घरकुल लाभार्थी चिंतेत पडले आहेत एकीकडे घरकुला साठी ग्रामपंचायत मध्ये ओबीसी एस सी कास्ट सर्टिफिकेट असलेल्यांना घरकुलासाठी लागणारे आवश्यक ती कागदपत्रे मागवीण्यात येत असून घरकुलाच्या अपेक्षांनी नागरिकांची कास्ट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी व इतर कागदपत्र जमवीण्यासाठी धावपळ सुरू आहे रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजनेमधून लोकांना घरकुलाचा लाभ मिळत असून रेतीअभावी पहिलेच घरकुल अपूर्ण असून दुसऱ्या घरकुलाच्या हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात पडेल का हा पण प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे.
रेती मिळत नसल्याने लाभ लाभधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे शासनाने घरकुल लाभधारकांना पाचब्रास रेती मोफत देण्यात यावी असे जनतेतून बोलले जात आहे ज्यांना घरकुल मिळाले त्यांनी आपले होते तेही राहते घर मोडून पालामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहेत जवळपास बारा महिन्यापासून रेती मिळत नसून घर मोडल्यांची पावसाळ्यामध्ये हाल झाले असून थंडीमध्येही आता काकडणार आहे अशी स्थिती झाली आहे रेती नसल्यामुळे बांधकाम मजुर बेरोजगार झाला आहे घर बांधकाम करणाऱ्या मजुरांना उपासमारीची वेळ आली आहे माहूर तालुक्यात अनेक रेती घाट असून एक तरी घाट लिलाव होऊन हाताला काम मिळेल का याकडे बांधकाम कामगारांचे लक्ष लागले आहे लोकप्रतिनिधींनी व मायबाप सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.