शेतकऱ्यांचा कोट्यावधी रुपयाचा कापूस ज्यादा भावाने खरेदी करून पैसे न देता फरार झालेला आरोपी जगन रामचंद्र नारखेडे उर्फ जग्गू डॉन याला गोरखपुर राज्य मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेवुन पोस्टे मलकापुर शहर येथे आणुन दि. 21/12/2023 ला हजर करन्यात आले असून शेवटी "कानून के हात बहोत लंबे होते है याचा प्रत्यय आला"
याबाबत मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दि 30/11/02023 रोजी फिर्यादी अतुल मधुकर पाटील रा कुंड ता मलकापुर यांनी पोस्टेला तोंडी रोपोर्ट दिला की त्यांनी त्यांचे 18 एक्कर शेतामध्ये पिकवलेला 153 क्विटल कापूस बाजारामध्ये कापसाचे भाव 7500/- रु. ते 7800/- रु प्रती क्विटल असतांना आरोपी नं 1 जगन ऊर्फ जगन रामचंद्र नारखेडे 2. शरद विष्णु योरले दोन्ही रा भालेगाव ता मलकापुर 3. राजेश पुंडलिक पाटील रा कुंड यांनी फिर्यादी व त्यांचे गावात राहणारे इतर साक्षीदार शेतकरी यांना विश्वासात घेवून प्रती क्विटल 9000/- रु प्रमाणे फिर्यादी पांचा 153 क्विटल फापस 13,80,600/. रु. चा तसेच साक्षीदार क्र 2 यांचा 32 क्विटल 58 किलो किमती 2,93,220/- रु. चा कापूस तसेच साक्षीदार क्र. 3 चा 23 क्विंटल कापूस 2,07,000/- रु. चा साक्षीदार क्रं 4. यांचा 09 क्विटल 21 किलो कापूस किमती 82,890/- रुचा फापुस साक्षीदार क्र. 5 चा 29 क्विटल कापुस किमती 2.61,000/- रुचा असा 22,24,710/- रु. चा विश्वासाने संगणमत करुन खरेदी करुन फिर्यादी यांना फक्त 1,66,650/- रु नगदी देवून एक महीन्याचे करारावर कापूस घेवून गेले. परंतु उर्वरीत बाकी राहीलेले कापसाचे 20,58,060/- रु दिले नाही फिर्यादी व साक्षीदार यांची नमूद आरोपीतांनी संगणमत करुन आर्थीक फसवणूक केली अश्या प्रकारची तक्रार दिल्याने पोस्टेला आरोपीतांविरुध्द अप नं 600/2023 कलम 420, 406, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयात आरोपी 1.राजेश पांडुरंग पाटील 2. शरद विष्णु बोरले यांना दि 01/12/2023 चे 00/23 वा अटक करण्यात आली यातील मुख्य आरोपी जगन रामचंद्र नारखेडे रा. भालेगाव हा फरार असून त्याचा कसोशीने शोध घेत अटक करण्यात आलेल्या आरोपीतांचा सदर गुन्हयाचे तपासकामी पोलीस कस्टडीची आवश्यकता असल्याने त्यांना मा न्यायालयात हजर केले अमता मा न्यायालयाने दोन्ही आरोपीतांचा दि 04/12/2023 रोजी पायेतो पोलीस कस्टडी रोमांड दिलेला होता त्यानंतर सदर आरोपीचा पीसीआर मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं अमता त्यांना न्यायालयाने जामीनावर मुक्त केले
सदर गुन्हयातील आरोपीतांनी मलकापुर तालुका तसेच इतर तालुक्यातून सुध्दा शेतक-यांचा कापूस घेवुन त्यांना अदयापर्यंत कापसाचे पैसे दिलेले नसल्याने शेतक-यांमध्ये असंतोषाचे वातावरण असुन सदर गुन्हयाचा सखोल व बारकाईने गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक श्री सुनिल कड़ामने , अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक थोरात , उपविपोअ श्री देवराम गवळी व पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पांचे मार्गदर्शना खाली पो.उपनि सुरेश रोकडे, पो.कों संतोश पेंढारकर व नं 2663 पो.का. गोपाल तारुळकर व नं 25 हे करीत असतांना तपास अधिकारी यांनी यातील फरार आरोपी नामे जगन रामचंद्र नारखेडे ता भालेगाव ता मलकापुर याचे शोधकामी कसोशीने प्रयत्न करीत असतांना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पोलीस कॉन्स्टेबल गोपाल तारुळकर यांनी नमूद आरोपीतांचे तपास अधिकारी यांनी प्राप्त करुन दिलेले मोबाईल क्रमाकाचे सीडीआर, एसडीआर व टावर लोकेशन प्राप्त करणे करीता सायबर बुलडाणा यांना पोका संतोष पंढारकर यांनी पत्रव्यवहार केला होता त्याबाबत सायबर बुलढाणा येथून आम्हाला सदर आरोपीचे शोधकामी दि 19/12/2023 रोजी रात्रीचे सुमारास सकारात्मक माहीती प्राप्त झाल्याने आम्ही सदर माहीती तात्काळ पो .नि श्री विलास पाटील पो अधिक्षक श्री सुनिल कडासने, श्री अपोअ श्री थोरात यांना दिली असता त्यांनी तात्काळ तपास अधिकारी पोउपनि सुरेश रोकडे सोबत पोका गोपाल तारुळकर, पोका संतोष पेंडारकर, पोका नासीर शेख, पोका नवल राठोड, पोका इश्वर वाप यांना आरोपी शोधकामी मथुरा हमीरा हाउस नं. 17 मोहतारा व्हिलेज गाव मुसामुंडी ता बजाक, जि दिडोरी राज्य मध्यप्रदेश येथे जाण्याची परवानगी दिल्याने नमूद पो स्टाफ असे खाजगी वाहनाने मध्यप्रदेश येथे रवाना झाले परंतु सदर आरोपी सोबत त्याचा सहकारी पृथ्वीराज तायडे रा भालेगाव हाही मिळून आल्याने त्यांना सदर गुन्हात रात्री उशीरा आम्ही गोरखपुर राज्य मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेवुन पोस्टे मलकापुर शहर येथे आणुन दि. 21/12/2023 चे 15/13 वा अटक करण्यात आली. त्यांचेकडून एक मो. कार जप्त करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयात पी.सी. आर. कामी हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना दि. 28/12/2023 पावेतो पी. सी. आर. मंजुर केला आहे. तसेच आतापावेतो पोस्टे मलकापुर शहर येथे आरोपीतांविरुध्द 50-60 शेतक-यांनी कापुस खरेदि करुन त्याचे पैसे न दिल्याचे तक्रारी नोंदविल्या आहेत. त्यांचा एकुण कापुस अंदाजे 6,000/- क्विंटल अंदाजे किमत 5,4,000,000/-रु. चा विकत घेवुन त्याचा मोबदला दिलेला नाही.
सदर गुन्हयाचा तपास पो. अ. श्री कडासने , अ पो अ.श्री. थोरात , SDPO श्री. गवळी , पो नि श्री. विलास पाटील , यांचे मार्गदशनाखाली तपास अधिकारी पोउपनि सुरेश रोकडे सोबत पोका संतोष पेंढारकर, पोका गोपाल तारुळकर हे करीत आहेत.