नांदगावात पुण्यस्मरण दिनानिमित्त दत्त नाम सप्ताहाचे आयोजन


 ग्रामीण प्रतिनिधी  विलास  लामतलवारे 


लोहा तालुक्यातील नांदगाव येथील दत्त मंदिरात गुरुवर्य जयगिर महाराज गुरु किशनगिर महाराज यांच्या 16 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अखंड दत्त नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले

श्री समगिर महाराज गुरु जयगिर महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सप्ताहस प्रारंभ झाला असुन मंगळवारी 24 तारखेपर्यंत चालणार आहेत्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले .मुर्ती अभिशेक .आरती. पारायण.व दुपारी श्री संत बाळगीर महाराज जीवन चरित्र वाचन व रात्री महापुजा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे 128 मनुष्य एका एका पहार्यास आसुन परिसरातील सर्व मारतळा.हातणी.नांदगाव चिंचोली कौडगाव कामळज राहेगाव काकांडी टाकळगाव शंभरगाव कांजाळा गुंडेगाव वाळकि बु देवापुर या सर्व गावकर्यांनी पहार्यामध्ये सहभाग घेतला आहे 

अखंड श्री दत्त नाम पहारा आहे मंगळवारी 24 ता.रोजी सकाळी 7 वाजता पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील सदभक्तांनी कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री निरंजन महाराज गुरु समगिर महाराज मठ संस्थान नांदगाव यांनी केले