सतीश कोळी,खुलताबाद
अराजपत्रीत कर्मचाऱ्यांना सण अग्रीम अनुज्ञेय केलेला आहे. सुरुवातीपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेळोवेळी शासनाने ठरविल्या नुसार सण अग्रीम प्राप्त झाला असून नियमानुसार वसूलही झालेला आहे.मात्र २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात अनेक जिल्हा परिषद अधिनस्थ प्राथमिक शिक्षकांना दिवाळी सणाच्या निमित्ताने मागणी करूनही सण अग्रीम देण्यात आला नाही. याबाबत मा.शिक्षण उपसंचालक (प्राथमिक), पुणे यांच्या कडून मनाई करण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले.सोबतच ज्या जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांच्या सण अग्रीमसाठी पंचायत समिती निहाय तरतूद केली आणि सण अग्रीम मंजूर झाला त्या शिक्षणाधिकान्यांना संचालनालयाकडून कारणे दाखवा नोटीस आलेत आता तर अशा शिक्षणाधिकाऱ्यांना ज्ञापन पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे..
शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वेतन, भत्त्यासाठी आवश्यक तरतूद केली जात नाही आणि ज्याठिकाणी वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, अन्य थकबाकी वा सण अग्रीम दिला जातो त्याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जातो. त्यामुळे जिल्हा स्तरावरील कोणतेही अधिकारी देयके मंजूर करत नाही. यावर्षी तर अनेक जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सण अग्रिमच्या संबंधात नकारात्मक भूमिका घेतलेली आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षक समितीने मा. रणजितसिंगजी देओल साहेब (भा.प्र.से.) प्रधान सचिव (शालेय शिक्षण विभाग) महाराष्ट्र शासन, मुंबईमा. तुषारजी महाजन साहेब उपसचिव (शालेय शिक्षण विभाग) महाराष्ट्र शासन,मुंबई यांच्या कडे एका निवेदनाद्वारे विनंती केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना शासनाच्या धोरणानुसार व नियमानुसार सण अग्रिमचे प्रदान होण्यासाठी आणि आगामी दिवाळी सणाच्या निमित्ताने केली जाणारी मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना सण अग्रीम मिळण्यासाठी आवश्यक वित्तीय तरतूद करावी तसेच याबाबत अनुकूल कार्यवाही करण्याचे निर्देश शासन स्तरावरून शिक्षण संचालनालयाला द्यावेत अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षक नेते : मा.उदय शिंदे,विजय कोंबे राज्याध्यक्ष,राजन कोरगावकर राज्य सरचिटणीस,राज्य सल्लागार विजयकुमार पंडित,महादेव पाटील माळवदकर,राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, आनंदा कांदळकर, विलास कंटेकुरे,राज्य कार्याध्यक्ष सयाजी पाटील,राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर,राज्य संघटक राजेंद्र खेडकर,सुरेश पाटील,राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील,सतिश सांगळे,राज्य संपर्क प्रमुख किशन बिरादार,राज्य प्रवक्ता नितीन नवले,राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर,राज्य ऑडिटर पंडित नागरगोजे,महिला आघाडी प्रमुख वर्षाताई केनवडे,नपा मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत,जुनी पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुंडकर,उर्दू आघाडी प्रमुख सैय्यद शफीक अली,छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर यांच्या कडून विनंती करण्यात आली असल्याचे मराठवाडा विभागीय प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी सांगितले