शेल्हाळ :- जिल्हा परिषद प्रा शाळा शेल्हाळ येथे तोंडचिर केंद्रातर्गत शिक्षणपरिषद तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. शेख शफिक यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाली.प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली स्वामी यांनी केले.यावेळी पॅट अंतर्गत संकलित चाचणी 1व राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण, प्रशांत दिव्यांग मुलांची नोंद केंद्र शासन निर्मित ॲप वर करण्याच्या मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या.इंग्रजी विषयासंदर्भात टॅग मीटिंग, आकारिक मूल्यमापन नोंदी करताना घ्यायची काळजी तसेच नोंदी कशा करायच्या याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.या शिक्षण परिषदेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय दिलीप चिखले प्रहार संघटनेचे उदगीर विधानसभा अध्यक्ष सूर्यभान चिखले, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य किशनराव कोयले उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लोकसंख्या विषयक लोकनृत्यस्पर्धात विभागस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या लोकनृत्यचे बहारदार सादरीकरण केले तसेच इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी मिळून मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा गीताचे सादरीकरण केले. तोंडचिर केंद्रातील श्री होळसंबरे विवेक यांचे कोल्हापूर येथील हाफ आर्यन मॅन स्पर्धा जिकंल्यामुळे शाळेच्या वतीनेसत्कार करण्यात आला. केंद्राचे केंद्रप्रमुख श्री हंगरगे आर डी, श्री मदन बिरादार, श्री कांबळे, श्रीमती पाचंगे मॅडम साधन व्यक्ती श्री.दायमी एम. एन., राठोड एस. के.श्रीमती जना कोलमारे हे सुलभक म्हूणन उपस्थित होते.
या परिषदेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका बन एस. व्ही,केंद्रे एम के,जांभळे एस डी, पांचाळ के एन, घाडगे पी.के, फावडे ए.बी.चव्हाण व्ही. एन. तसेच श्री पेठे पी. व्ही. शेख ए. डब्लू, भाडसिंगे एस. डी यांनी प्रयत्न केले.