जिल्हा परिषद शाळेत शालेयपयोगी साहित्य वाटप केले



ग्रामीण प्रतिनिधी- शंकर निंबारे, देवडोंगरी

    कास येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक आगारातील वाहक अमोल रावते परिवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्ये वाटप केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील, ग्रामपंचायत देवडोंगरा येथील कास गावातील जिल्हा परिषद शाळा इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत चार वर्ग आहेत. याठिकाणी अमोल रावते परिवार हे त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी असून या परिवाराने आपल्या मुलाचा वाढदिवस आगळावेगळा करण्याचे ठरविले. 

    वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी निर्माण होऊन गरजु विद्यार्थ्यांना मदत करण्याची लहानशी संधी मिळाल या हेतूने शालेयपयोगी साहित्य बॅग, पाण्याची बॉटल आणि खाऊ विद्यार्थ्यांना भेट देऊन रावते परिवाराने मुलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पवार यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भूषण राऊत,सहशिक्षक विलास गारे, अंगणवाडी राधाबाई पवार, आशाकार्यकर्ती लता चौधरी राजेश्वरी पवार माता पालक गटाची अध्यक्ष राजेश्वरी पवार, तुकाराम पवार, ढवळू पवार, सीताबाई वाघमारे, बारकु पवार उपस्थित होते.