प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून चाकुने भोसकून युवकाचा निर्घून हत्या

वानखेड  . येथे रविवार १० सप्टेंबर च्या दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका २५ वर्षीय अविवाहित युवकाचा चाकूने भोकसून खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे . यामूळे गावात दहशत पसरली आहे . हत्त्या झालेल्या युवकाचे नाव आकाश सुरेश परघरमोर असे आहे. ..तर आरोपी त्रिशरण रामदास इंगळे वय ४० वर्षे यास पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे. मृतक व आरोपीच्या पत्नी चे प्रेमप्रकरण असल्याचा संशयाचा भूत सवार झाल्याने दिवसाढवळ्या हे हत्याकांड घडले आहे. मृतकाची बहीण  कु . दिक्षा सुरेश परघरमोर हीचे फिर्यादीवरून आरोपी त्रिशरण इंगळे विरुद्ध तामगाव पोस्टेमध्ये अप. नं. २४३ / २३ कलम ३०२, ५०४, ५०६ भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. वरवट बकाल येथील  ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर आकाशवर शोकाकुल वातावरणात संध्याकाळी ७वाजता वानखेड स्मशानभूमित पोलीस बंदोवस्तात अंतिम संस्कार करण्यात आले. मृतक व आरोपी याचे घर समोरा समोर आहेत. आरोपी त्रिशरण इंगळे याची पहिली पत्नी मुले येथे सोडून काही वर्षापूर्वी पळन गेली. दरम्यान दूसरी पत्नीसोबत पण त्रिशरणचे वारंवार चारित्र्यावर संशय घेऊन खटके उडत होते. दरम्यान ९ सप्टेबर रोजी पत्नीला त्रिशरणने मारहाण केली त्यामुळे ती मुलीसह माहेरी निघुन  गेली होती. मृतक आकाश व पत्नीचे प्रेमसंबध असल्याचा त्याचा संशय होता. त्या संशयाने पछाडल्याने १० सप्टेबर रोजी दुपारी १२ वाजता घराजवळ आकाश यास त्रिशरण याने डाव्या बगली खाली चाकूने सपासप वार करून निर्दयीपणे भोसकले. यामुळे आकाश क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात पडला

त्याच्या जीवाच्या आकांताच्या किकांळ्या ऐकूण आई, बहिण व वडील हे धावत आले . त्यांना सुध्दा त्रिशरणने चाकूच्या धाकावर धमकावले या बाबत माहिती होताच आरोपी मोटरसायकल सोडून घरात पळाला. तत्काळ तामगाव पोस्टे चे ठाणेदार उलेमाले, पीएस आय सोनवणे, बीट जमदार दयाराम कुसुंबे, पोहेकॉ अशोक वावगे, प्रमोद मुळे, अंमलदार मनिष वानखडे इत्यादी घटनास्थळी पोहचले. व आरोपीस अटक केली. दरम्यान मलकापूर डिवायएसपी गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जेसीबी ड्रायव्हर असलेला आरोपी हा गत १५ दिवसापूर्वी पूणे येथून गावात परतला होता. तर मृतक आकाश हा मोलमजुरी करायचा