प्रतिनिधी संजय बच्छाव
साक्री तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी भाजपाचे जेष्ठ नेते श्री सुरेश पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हणण्यात आले की साक्री तालुक्यात दरवर्षीपेक्षा यावर्षी एक महिना उशिरा पाऊस पडल्याने तोही रिमझिम पाऊस अशा पावसातच शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या उरकल्या. 15 जुलैपासून थोड्याफार पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली ते पैसे सुद्धा सावकाराकडून व्याजाने कर्ज घेऊन व आपल्याकडील थोडीफार पैसा व उसनवार घेऊन शेतात भांडवल म्हणून वापरून टाकले. परंतु ऑगस्ट संपला तरी देखील पाहिजे तसा पाऊस झाला नाही व आता तर देवाने पूर्ण मोकळे वातावरण करून टाकले. श्रावण महिन्यात उन्हाळ्यासारखे ऊन पडू लागले पिके करपू लागली आहेत. तसेच शेतकरी सुद्धा करू लागले आहेत. शेत जमिनीला मोठ्या भेगा पडायला लागले आहेत. अद्यापही पावसाचे काहीच वातावरण दिसत नसल्यामुळे शेतकरी भयानक संकटात सापडला आहे. मोठ्या हिमतीने आणि पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी जमिनीत पैसा टाकला आहे. मात्र साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातात एक पैदेखील येणार नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. विहिरींनीही तळ गाठला आहे. गुराढोरांना देखील पिण्यासाठी पाणी नाही. तशातच महावितरण कंपनीचा भोंगळ कारभारामुळे लाईट देखील वेळेवर मिळत नाही. आणि जर मिळाली तर ती देखील दोन दोन पाच पाच मिनिटात ट्रीप केली जाते. आता शेतकरी मरेल की जगेल अशी चिंता वाटू लागली आहे. हे सर्व गंभीर प्रश्न या सर्व परिस्थितीचा विचार करून वरिष्ठ स्तरावर जिल्हाधिकारी व शासनाची तात्काळ संपर्क करून. संपूर्ण साक्री तालुका सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करावा. असे मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री आबासाहेब सुरेश पाटील, जि. प. सदस्य गोकुळ सिंग परदेशी, नगरसेवक सुमित नागरे, मालपुर चे माजी सरपंच नयनेश भामरे, अनिल पवार, सतीश दादा कासारे, युवराज काकुस्ते, आबासाहेब विलास देसले, भूषण ठाकरे, श्री अविनाश बच्छाव दहिवेल, सुरेश शेवाळे, राकेश दहिते. विशाल सोनवणे मालपुर, योगेश भामरे, युवराज मोरे, हंसराज भोसले, तसेच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे साक्री तालुका उपाध्यक्ष श्री संजय कालेश्वर बच्छाव दहिवेल. असे भाजपाचे सर्व कार्यकर्ते व विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते