साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे तालुका स्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर


 प्रतिनिधी (कार्तिक राजगुरु)

जैतखेडा :- कन्नड येथील शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विभागाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १२३ व्या जयंती निमित्त दि.२२.०८.२०२३ रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा साठे यांचे:जीवन आणि कार्य याविषयावर तालुका स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १२५ विद्यार्थ्याने या स्पर्धेत सक्रीय सहभाग नोंदविला होता.

 यास्पर्धेत कु. भारती सुंदरसिंग ताटू , कला व वाणिज्य महाविद्यालय, लिंबाजी (चिंचोली) (प्रथम क्रमांकाचे पारितोषिक - रोख १०५१ रुपये, व प्रमाणपत्र) , कु.कृतिका सोनवणे , स्वर्गीय के.के.जाधव माध्यमिक विद्यालय ( द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ,रोख ७०१ रुपये तृतीय व प्रमाणपत्र) , आणि कु. शीतल संजय दाभाडे , शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड. ( तृतीय क्रमांकाचे पारितोषिक, रोख ५०१ रुपये व प्रमाणपत्र) , तर अनुक्रमे कांता संजय चौतमल, संत ज्ञानेश्वर विद्यालय, कन्नड ( उत्ते जनार्थ पारितोषीक, रोख २५१ व प्रमाणपत्र) , कु. नम्रता पोपट नाडे , आसारामजी भांडवलदार महाविद्यालय, देवगाव (रंगारी) (उत्तेजनार्थ पारितोषीक, रोख २५१ व प्रमाणपत्र) व कु. भक्ती मनोज आढाव,कला व वाणिज्य महाविद्यालय, लिंबाजी (चिंचोली)( उत्तेजनार्थ पारितोषीक, रोख २५१ व प्रमाणपत्र) यांनी गुणांनुक्रमे पारितोषिक मिळविले आहे.प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे व प्रा. अल्का गडकरी यांनी निबंध मूल्यांकनाची जबाबदारी पार पाडली. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र तयार झाले आहेत. तरी त्यांच्या शिक्षणानी लोकप्रशासन विभागातून घेऊन जावेत व या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. व्हि.एन भोसले यांनी केले आणि महाविद्यालयाच्या नियोजित कार्यक्रमात त्यांना बोलावून पारितोषिक सन्मान पूर्वक वितरण करण्यात येईल असे कळविले.