कागणे इन्स्टिट्यूट मध्ये गणपती निमित्त बहुपर्यायी परीक्षेचे आयोजन



 प्रतिनिधी (कंधार)* :-  मारोती जिनके 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कागणे इन्स्टिट्यूट तर्फे विद्यार्थ्यांसाठी बहुपर्यायी परीक्षेचे २५ सप्टेंबर २०२३ रोज सोमवारी दुपारी ३ वाजता आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत इंग्रजी गणित सायन्स विषयावर आधारित बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते. सदरील परीक्षा ही कागणे इन्स्टिट्यूट तर्फे गेल्या पाच वर्षापासून घेतली जात आहे.

कागणे इन्स्टिट्यूट तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत एकूण 256 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची होती या परीक्षेत एकूण 50 प्रश्न 100 गुणांसाठी विचारण्यात आली होती. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या युगात आपला ठसा उमटविता यावा यासाठी विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपाचे स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन केले जाते. विद्यार्थी सुद्धा लेखी परीक्षा पेक्षा बहुपर्यायी परीक्षेत जास्त आवड दाखवताना दिसून आले. सदरील परीक्षेच्या यशस्वीतेसाठी कागणे इन्स्टिट्यूट चे परमेश्वर कागणे शिक्षक, युनुस बेग शिक्षक, विकास चव्हाण शिक्षक, आंतेश्वर कागणे शिक्षक, माधव गोटमवाड शिक्षक, सचिन गायकवाड शिक्षक, मदन मुंडे लिपीक, गोविंद कंधारे आदि नी परिश्रम घेतले.