प्रतिनिधी:- अजय सुरत्ने
अकोट:-तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या मार्डी येथील कु,तेजस्वीनी कैलास पालवे हिची अकोट तहसील कार्यालय येथे दि, 30 सप्टेंबर 2023 रोजी कोतवाल पदी निवड करण्यात आली.
मार्डी हे गाव अंत्यत डोगराळ दुर्गम आदिवासी भागात आहे तेजस्वीनी हिला शिकविण्याकरिता तिच्या वडिलांनी खुप आभाळकष्ट केले तिच्या वडिलांची खुप इच्छा होती की माझी मुलगी शिकावी व काही करून दाखवावं त्या करिता त्यांनी शेतमजुरी सुद्धा केली कालंतराने कु,तेजस्वीनी कैलास पालवे हिला पहिल्याचं प्रयत्नात यश मिळाले तसेच कोतवाल पदी या मुलीची निवड झाली म्हणुन मार्डी या गावातील नागरिकांनी तिचे भर-भरुन कौतुूक केले व एकलव्य एकल विद्यालय याच्या कडून आदिवासी परिवारातील कु,तेजस्वीणी हिचे सत्कार पण करण्यात आले तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.