प्रतिनिधी- कार्तिक राजगुरु जैतखेडा
जैतखेडा:-वेरुळ येथे विश्वकर्मा पुजन दिन विश्वकर्मा वंशीय समाजाचे महाअधिवेशन मोठ्या उत्साहाता संपन्न झाले.सुतार,लोहार,सोनार,शिल्पकार व ताम्रकार या शिल्पी समुहातील पाच समाज बांधवांचा महामेळावा व राष्ट्रीय महाअधिवेशन विश्वकर्मा मंदीर येथे विश्वकर्मा वंशीय समाज संघटन यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे अध्यक्ष प्रा.नागोराव पांचाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड ,कन्नडचे आमदार उदयसिंग राजपुत, मेहकरचे आमदार डाँ.संजय रायमुलकर, वंचितचे अमित भुईगळ,भाजपचे संजय खंबायते यांची प्रमुख उपस्थिती होती.समाजातील जेष्ठ कामगार यांना अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात येऊन हा नवीन स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्रातील विविध जिल्हातील विश्वकर्मिय समाजबांधवांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.प्रमुख आतिथी म्हणुन वेरुळ पिठाचे धर्मगुरू महंत महेंद्र बापु महाराज,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागोरावजी पांचाळ सर,प्रदेशाध्यक्ष बजरंग दादा खर्जुले,सोनार फेडरेशनचे मोहन हिवरकर,संजय शहाणे,संजय सुतार,
समाधान यशिकर, पराग अहिरे, गजेन्द्र सोनवणे,दिलीप सुतार, तानाजी शेटे, अशोक पगार, रोहिताश जांगिड, सुनील जानवे, हेमंत मिस्त्री,प्रकाश जांगिड, रवींद्र पांचाळ, विष्णु पांचाळ आदी उपस्थित होते.
शिक्षण,चिंतन,प्रबोधन आणी संघटन या माध्यमातून समाजहिताचे संवर्धन करणे,समाज एकत्रिकरण करणे व राजकीय व सामाजिक ताकद निर्माण करण्यासाठीच संघटनेमार्फत महाअधिवेशन आयोजित केले असल्याचे तसेच या समाजाला आतापर्यंत फक्त उपेक्षित बघण्यात आले असुन आजपर्यंत सगळ्याच राजकीय पक्षाने समाजाचा फक्त वापरच करुन घेतला असुन यापुढे समाजाने एकत्र येत शिक्षण,संघटन या माध्यमातून सामाजिक ठसा उमटवत राजकीय पटलावरही अग्रेसर राहत समाजहीत जोपासले पाहीजे व गटातटाच्या राजकारणात न पडता विश्वकर्मिय म्हणुन समाजातील ऐक्यासाठी सर्व संस्था,संघटना यांनी आपापसातील हेवेदावे विसरुन असे जाहीर आवाहन अध्यक्ष प्रा. नागोरावजी पांचाळ सर यांनी केले.
राज्य प्रवक्ते भाऊसाहेब राऊत व वीलास पवार यांनी प्रास्तविक करत विश्वकर्मा वंशिय समाज संघटन मार्फत राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम व आगामी काळातील वाटचाल याचा लेखाजोखा मांडला.तसेच राज्य कार्याध्यक्ष अरुण भालेकर यांनी विविध ठराव सर्वानुमते घेत समाज बांधवांसमोर त्याचे जाहीर वाचन केले.उपस्थितांनीही हात उंचावत सर्व ठरावांना संमती दर्शवली.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहीती दिली प्रा.नागोरावजी पांचाळ सर यांनी दिली व विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या माध्यमातुन पीएम विश्वकर्मा योजनेची माहीती व नावनोंदणी समाजबांधवांच्या घरापर्यंत करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी अधिवेशनात खालील ठराव संमत करण्यात आले.
ठराव क्रमांक -१ विश्वकर्मिय समाज हा ओबीसी प्रवर्गात येतो परंतु आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनांचे फायदे समाजाला मिळाले नाही या अनुषंगाने प्रथमच जनगणना करण्यात यावी.
ठराव क्रमांक-२ प्रधानमंत्री विश्वकर्माकौशल्य सन्मान योजना 2023 नुसार लाभार्थीप्रशिक्षण व नंतर 5%टक्के व्याजाने रुपये दोन लाख प्रत्येकी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी विश्वकर्मीय यांना फक्त कामगार म्हणून वाढवण्यापेक्षा त्यांना स्वयं उद्योजक किमान दहा ते वीस लाखापर्यंत दर साल दर शेकडा तीन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे,तसेच
ठराव क्रमांक -३ महाराष्ट्र सरकारने घोषित केलेले विश्वकर्मा आर्थिक विकास महामंडळ बाबत लवकरात लवकर निधीची पूर्तता करून कार्यान्वित करणे व त्याचे अध्यक्षपद विश्वकर्मीय समाजातील व्यक्तीलाच देण्यात यावे.
ठराव क्रमांक:- ४ वेरूळ हे विश्वकर्मीय समाजाचे श्रद्धास्थान असून प्रभू विश्वकर्मा यांची जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. प्रभू विश्वकर्माचे जन्मस्थान असल्याचे अनेक पुरावे पौराणिक ग्रंथ व अनेक हिंदू धर्म ग्रंथात असून या क्षेत्रास विश्वकर्मा यांचे धार्मिक क्षेत्र म्हणून घोषित करावे तसा उल्लेख करून त्याची शासनामार्फत घोषणा करावी.
ठराव क्रमांक :- ५ विश्वकर्माीय समाजाचे ज्येष्ठ पत्रकार लोकशाही टीव्हीचेे संपादक श्री. कमलेश सुतार यांच्यावर राजकीय आकासापोटी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे.
ठराव क्रमांक:- ६ विश्वकर्मी समाजाचे प्रेरणास्थान आद्य संत भोजलिंग काका यांची समाधी आळंदी स्थित असून ते स्थान सर्वसामान्यांना दर्शनासाठी उपलब्ध नाही ते सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात यावे व त्याची माहिती दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात यावी तसेच संत भोजलिंग काका यांनी संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांचा सांभाळ केला असल्याने आळंदी येथे संत भोजलिंग काका यांच्या नावाने एक वारकरी विद्यापीठ सरकारने सुरू करावे.
ठराव क्रमांक :-७ महाराष्ट्र सरकार तर्फे आयटीआय प्रशिक्षण मध्ये विश्वकर्मा वंशीय शिक्षण इतर कला या समाविष्ट करण्यात याव्यात व त्यात या समाजातील व्यक्तींनाच समाविष्ट करावे व तसेच
ठराव क्रमांक:- ८ जेष्ठ शिल्पकार श्री. राम सुतार यांच्या नावाने विश्वकर्मा शिल्पकला विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करणे.विश्वकर्मा समाज हा जातीवंत कारागीर असल्याने 90 दिवसाचा पुरावा ही अट बंद करण्यात यावी.
ठराव क्रमांक:-९ महाराष्ट्रात राहणाऱ्या जांगिड सुतार बांधवाना महाराष्ट्रात ओबीसी सर्टिफिकेट तात्काळ देण्यात यावे.महाराष्ट्रात जांगिड समाजात ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांना अडचण निर्माण होते तरी शासनातर्फे एक जीआर काढून जांगिड समाजास सुतार म्हणून ओबीसी मध्ये समाविष्ट करणे यासह विविध ठराव सदरील अधिवेशनात मांडण्यात आले. सरचिटणीस संजय सुतार,प्रदेशाध्यक्ष बजरंग खर्जुले, राज्य कार्याध्यक्ष अरुण भालेकर यांनी सदरील ठराव मांडले तर प्रस्तावना भाऊसाहेब राऊत यांनी केली तर आभार विष्णु पांचाळ यांनी केले.
प्रारंभी सकाळी विश्वकर्मा मंदिर येथे ध्वजावरोहण करून पुरातन विश्वकर्मा मंदिर विश्वकर्मा कुंड (अहिल्याबाई होळकर कुंड) ते नवीन विश्वकर्मा मंदिर कन्नड रोड अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या अग्रभागी पंचरंगी ध्वज व शिरसिंगी कर्नाटक येथून आलेल्या सद्भावना ज्योत चे ढोल ताशाच्या व डिजे च्या गजरात मिरवणुक काढण्यात आली यावेळी महिलां पुरुषांसह आबाल वृद्धांनी ठेका धरला होता यानंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमात समाजातील विविध मान्यवरांना जीवनगौरव व विशेष गौरव या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
मेहकर चे आमदार संजय रायमुलकर यांनी सुतार समाजास आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल व मानवत चे नगराध्यक्ष अंकुशराव लाड यांनी समाजासाठी केलेल्या भरीव कार्यासाठी यांचा समाजाच्या वतीने विशेष नागरी सत्कार करण्यात आला.प्रदीप जानवे मोहन हिवरकर, साहेबराव पोपळघट, राजाभाऊ नगरकर बजरंग हिंगे ,सुदाम आन्ना खैरनार भगवान शहाणे, सदाशिवराव हिवलेकर, संजय पेंभरे, यांचा समाजातील विशेष योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार आणि सन्मान करण्यात आला.विश्वकर्मावंशी समाज संघटनेतर्फे उपस्थित सर्व समाज बांधवांना महाप्रसादाचे व अन्नदान वाटप करण्यात आले.दिवसभर लाखो भाविकांनी प्रभू विश्वकर्मा यांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा आस्वाद घेतला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्य उपाध्यक्ष अरुण भालेकर मराठवाडा अध्यक्ष गोपाल राऊत जिल्हाध्यक्ष शिवानंद थोरकर, कोषाध्यक्ष गणेश गव्हाणे ,चंदू हिवाळे, कल्याण घुसळकर,,बालाजी पांचाळ, अमोल डोळस, परमेश्वर पांचाळ,किशोर भागवत, व्यंकटेश पांचाळ,गोपाल महामुनी, अवधूत सोनवणे, डॉ. गजानन पातूरकर, सत्यनारायण पांचाळ ,संजय दीक्षित, संजय सुतार, भाऊसाहेब राऊत, विलास पवार,दिलीप सोनवणे,ज्ञानेश्वर कौसाईतकर डॉ.गजानन पातुरकर संतोष पांचाळ,उमेश ढोले, दिलीप सुतार ,संतोष पांचाळ, सौ.शुभदा धामापुरेकर सौ. प्रमिलाताई सोनवणे राजेंद्र दांडगे ,सौ.कल्पना बुंदिले कार्तिक राजगुरू यांनी परिश्रम घेतले यावेळी महाराष्ट्र व परराज्यातुन आलेले समाज बांधव, विश्वकर्मा वंशीय संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,महीला आघाडी,तरण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दंगा काबू पथक व महाराष्ट्र पोलीस फोर्स यांचे पथक या ठिकाणी उपस्थित होते.