जिल्हाधिकारी यांची रस्ते विकास प्रकल्प आढावा बैठक संपन्न


 रघुनाथ खोत प्रतिनिधी निलंगा लातूर

मा जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीत आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत रस्ते विकास प्रकल्प आढावा व समन्वय बैठक संपन्न झाली.!आशियाई विकास बँक अर्थसहाय्य रस्ते विकास प्रकल्प टप्पा ३ अंतर्गत मतदारसंघातील आशिव - मातोळा - हसलगन - नांदुर्गा - गुबाळ - मंगरूळ - गांजनखेडा - किल्लारी - सांगवी - जेवरी - सिंगनाळ - *नणंद* या ५३ किमी लांबीच्या रस्त्याची तसेच महात्मा बसवेश्वर महाराज चौक, लातूर - खोपेगाव - कव्हा - जमालपूर - खुंटेगाव - हासेगाववाडी - जयनगर - आपचुंदा - जावळी - छत्रपती शिवाजी महाराज चौक, लामजना पाटी या ३२ किमी लांबीच्या रस्त्याची सुधारणा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित व्हावा यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाताई घुगे - ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्प आढावा व समन्वय बैठक संपन्न झाली.

या बैठकीदरम्यान मा जिल्हाधिकारी महोदयांनी १५ दिवसांच्या आत परिपूर्ण अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत, त्याअनुषंगाने आजच्या बैठकीत आवश्यक नियोजनही करण्यात आले. हे दोन्ही रस्ते झाल्यास हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. यावेळी मुख्य अधीक्षक अभियंता श्री सलीम शेख, उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कोरडे, श्रीमती शोभा जाधव, तहसीलदार श्री भरत सूर्यवंशी, श्रीमती उषाताई शृंगारे, गटविकास अधिकारी श्री युवराज म्हेत्रे, श्री सोपान अकेले व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.