निसर्ग मित्र समिती धुळे येथे श्री भाईदास निंबा कुवर शिक्षक ब्रामणवेल यानां राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित



संजय बच्छाव साक्री तालुका प्रतिनिधी.

दि. 9/9/2023 रोजी धुळे येथे महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज, राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त, आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, यानां आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. तो पुरस्कार काल पद्मश्री टाॅवर हाॅल मध्ये धुळे येथे मोठ्या दिमाखात पुरस्कार सोहळा साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक व टिडिएफ नेते श्री एस एम पाटील यांनी स्वीकारले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार श्री. किशोर जी दराडे साहेब हे होते. व सेवा  निवृत्त सहाय्यक शिक्षण संचालक दिलीप गोविंद निसर्ग मित्र समितीचे राज्य उपाध्यक्ष तथा जेष्ट पत्रकार सुभाष बिंदुवाल निसर्ग समितीचे सस्थांपक अध्यक्ष माननीय श्री प्रेम कुमार आहेर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष राव पाटील व विश्वासराव पगार यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष यांनी केले.

या कार्यक्रमासाठी आलेले साक्री तालुक्यातील बळिराम दादा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक भाइदास निंबा कुवर (पाटील सर) यानां शिक्षक आमदार किशोर जी दराडे साहेब यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून श्री पाटील सर हे आदिवासी भागात आपल्या शिक्षण प्रणालीचे काम अगदी नीटनेटके व अविरतपणे चालवित आहे. तसेच आपल्या शाळेवर पाटील सरांनी सामाजिक व शैक्षणिक, असे बरेच उपक्रम राबविले, तसेच वासखेडी गावातील सर्व तरुण मित्रांना एकत्र करून ग्रामविकास मंच स्थापन केला. ग्रामविकास मंचच्या माध्यमातून हजारो वृक्षांची लागवड केली व संगोपन केले त्यांची ही उत्तम कामगिरी पाहून निसर्ग मित्र समितीने श्री भाइदास निंबा कुवर (पाटील सर) यानां हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

श्री पाटील सरांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक, भाऊबंद, याच्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमासाठी निसर्ग मित्र समितिच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते.