किरण माने इंदापूर प्रतिनिधी
शेळगाव : (ता इंदापूर ) रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती ( दि २२ ) श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव या ठिकाणी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य साहेबराव शिंगाडे, भागवत भुजबळ, छत्रपतीचे संचालक ॲड लक्ष्मणराव शिंगाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. काही विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून आणि लेझीम पथक सादर करत संपूर्ण गावांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा संदेश देत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
सकाळी दहा वाजता मुक्ताबाई मंदिराच्या समोर मिरवणूक आल्यानंतर भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन साहेबराव शिंगाडे, सरपंच रामदास शिंगाडे, भगवान जाधव,मारुती सुपुते, मनोहर जाधव, अक्षय शिंगाडे,तानाजी माने, सचिन शिंगाडे आदींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गावामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक सादर केले. मिरवणुकीच्या वेळेस ठिकठिकाणी ग्रामस्थांनी प्रतिमेचे पूजन केले. मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर विद्यालयातील उपशिक्षिका कांबळे एस एस यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले