दहिवेल येथे आज पासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळा

 


संजय बच्छाव 

   साक्री तालुक्यातील दहिवेल येथे दिनांक 20 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन सोहळा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहात रोज पहाटे काकड आरती, सकाळी, व दुपारी, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, आरती, गीता पाठ तसेच रात्री कीर्तनाची सेवा होईल. तसेच रोज दुपारी व रात्री संत भक्तांकडून संतपंक्तीचे जेवण दिले जाते. यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा समावेश आहे. कीर्तनकार ह भ प नारायण महाराज भडणेकर, ह भ प सुरेश महाराज सर्वेकर, कीर्तनकार ह भ प स्वप्निल महाराज गिरडकर, ह भ प शिवानी ताई ताराबाद कर, ह भ प दत्तात्रय महाराज देवळेकर, ह भ प बाल कीर्तनकार आषाढी ताई सांजोरीकर, ह भ प कृष्णाजी महाराज चाळीसगावकर, तसेच दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेला ह भ प विश्वनाथ महाराज वाडेकर, यांचे दणदणीत असे काल्याचे कीर्तन होईल. व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. पारायण व कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन दहिवेल येथील ग्रामस्थांनी, भजनी मंडळ यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक दहिवेल ग्रामस्थ व भजनी मंडळ दहिवेल.