प्रतिनिधी हातणी विलास पाटील
लोहा तालुक्यातील येळी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची अंत्ययात्रा काढण्यात आली जालना येथील अंतरवाली सराटी येथील संवैधानिक पद्धतीने मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी उपोषण सुरू असताना त्यांच्यावर पोलिसांकडून केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासाठी येळी येथे सकल मराठा समाज येथील सर्व गावांतील गावकऱ्यांनी सहभागी होउन आरक्षण विरोधी शासनाचा निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंडा जवळ बसस्टँड पासुन गावातील मुख्य रस्त्याने त्यांची प्रेतयात्रा काढली . त्यानंतर आरक्षण न देणाऱ्या सरकार विरोधी घोषणा देत. आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बाप्पाचे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुडच्या खाली करा.. अशा घोषणानी परिसर दणाणून गेला होता . यावेळी. त्यात सकल मराठा समाज बांधवांनी व सर्व गावांतील पदाधिकाऱ्यांनी आरक्षणास विरोध करणाऱ्या सरकारचा विरोध करत जालना येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला . यावेळी येळी परिसरातील आजुबाजुचे मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली व गावातील दिगंबर पाटील ढगे यांनी मनोगत व्यक्त केले पहीले पाच वर्षे काय केले आणि आता काय करणार सर्व मराठा समाजातील आमदार खासदार मंत्री यांनी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा ऊलठ मराठा समाज रस्त्यावर ऊतरल्याशिवाय राहणार नाही आदीसह सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .