दहिवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू शेतकरी हैराण



साक्री तालुका प्रतिनिधी.  संजय बच्छाव दहिवेल.

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारा विरोधात कोणीही आवाज उचलायला तयार नाही सर्व पुढारी आमदार खासदार गायब झाले आहेत शेतकरी वाऱ्यावर सोडला असून स्वतः मात्र एसी गाड्यांमध्ये फिरत आहेत, शेतकरी मात्र स्वतःच्या मुलासारख्या सांभाळलेल्या पिकाला मात्र डोळ्या समोर कोरडा होऊन मातीमोल होताना बघत आहे विहीर किंवा नदीच्या पाण्याच्या साहाय्याने पिकाला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असताना मात्र महावितरण च्या भोंगळ अश्या कारभारा मुळे ते प्रयत्न देखील फोल ठरत आहेत

 नीट 20 मिनिट देखील वीज सुरळीत मिळत नाही अश्या परिस्थितीत सलग 42 दिवस पाऊस नसूनही दुष्काळ जाहीर करण्यात येत नाही सरकार देखील कोण मुख्यमंत्री व कोण उपमुख्यमंत्री हे ठरवण्यात मशगुल आहे पालकमंत्री तर फक्त कोणत्या जिल्ह्यात पैसे जास्त भेटतील तिथे स्वतःचा जिल्हा सोडून फिरत आहेत जोवर शेतकरी पेटून उठत नाही तोवर या कुंभकर्ण च्या झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला खडबडून जाग येणार नाही, त्यामुळे आमदार खासदार कुठेही दिसले तर त्यांना प्रश्न नक्की विचारा की तुम्हाला शेतकऱ्याची कीव कशी येत नाही इतके कशे पाषाण हृदयी आहेत असे शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याशिवाय यांना जाग येणार नाही* शेतकऱ्यांना उठा जागे व्हा.

.