नवसाक्षरता कार्यक्रम बहिष्काराबाबत बैठक संपन्न


सतीश कोळी,खुलताबाद प्रतिनिधी 

डॉ.महेश पालकर संचालक योजना-पुणे येथे आज नवसाक्षरता कार्यक्रम बहिष्काराबाबत बैठक संपन्न झाली.महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने बहिष्काराबाबत निर्णयावर कायम असल्याचे सांगण्यात आले. हा उपक्रम त्रयस्थ संस्थेमार्फत राबवावा--बी एल ओ कामासारखी परिस्थिती भविष्यात हे काम प्राथमिक शिक्षकांनीच करायचे असे परिस्थिती येऊ नये. याची दक्षता सर्व संघटनेने घेण्याबाबत सूतोवाच झाले.शासन परिपत्रकाद्वारे अनेक उपक्रम शिक्षकांवर लादत आहे . त्याचा परिणाम शिक्षणावर तर होतच आहे पण आता शिक्षकांच्या मानसिकतेवरही व्हायला लागला आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

                                       *शासनाबरोबर संघर्षासाठी तयार रहा* 

   आमचे प्रशासन कोणत्याही शिक्षक बांधवांवरती कार्यवाही करणार नाही पण योजनेला सहकार्य करा अशी भूमिका आजही प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आली.यावेळी राज्य नेते उदयराव शिंदे ,राज्याध्यक्ष विजय कोंबे ,राज्य सरचिटणीस -राजन कोरगावकर, राज्यउपाध्यक्ष -राजन सावंत ,राज्य कोषाध्यक्ष -नंदकुमार होळकर यासह पुणे जिल्ह्यातील शिक्षक बांधव उपस्थित होते.