कन्नड नं 1 मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


सतीश कोळी,खुलताबाद प्रतिनिधी 

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्नड नं.१ शाळेत मराठी व उर्दू माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आज दिलीप गायकवाड(के.प्र.) व सतीश कोळी (कें.मु.अ.)यांनी स्वखर्चाने खरेदी करून आणलेल्या पाण्याची बाँटल व शैक्षणिक साहित्याचे वाटप कन्नड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुनीताताई वेरुळकर,शिक्षण विस्तार अधिकारी नारायण भुजाडे,दवंगे सर (शि.वि.अ.),दिलीप गायकवाड (केंद्रप्रमुख) यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.प्रमुख अधिका-यांचा यावेळी शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.गट शिक्षणाधिकारी मँडम या़चे स्वागत जेष्ठ शिक्षिका कल्पना सुर्यवंशी,शि.वि.अ.भुजाडे सरांचे स्वागत कें.प्र. दिलीप गायकवाड तर दंवगे सर शि.वि.अ.यांचे शाळेचे मुख्याध्यापक सतीश कोळी यांनी स्वागत केले. यावेळी शालेय समितीचे सदस्य,तसेच उर्दूच्या नाजेरा अन्सारी,फरहीन खान,नंबर तीन शाळेच्या अर्चना पाटील,सुवर्णा गायके देखील उपस्थित होते.यावेळी गट शिक्षणाधिकारी वेरुळकर मँडम यांनी 

दिनांक 25/9/2023 ते 30/ 9 /2023 या कालावधीत आधार व्हॅलिटेशन करणे व अन प्रोसेस विद्यार्थी शाळा लॉगीन झिरो करणे बाबत मिशन राबवीने,त्यानुसार वरील कालावधीत सर्व केंद्रप्रमुख यांनी प्रत्यक्ष शाळा भेट देऊन आपल्या केंद्रांतर्गत सर्व माध्यमाच्या शाळेच्या लॉगिन वर उपलब्ध असलेल्या अन प्रोसेस विद्यार्थी तात्काळ शाळा लॉगिन वरून कमी करण्यात यावे वरील प्रक्रिया या आठवड्यात आपल्या सोयीनुसार करण्यात यावी सर्व विद्यार्थी व्हँलीड करणे आवश्यक असल्याचे सांगितले.आधार व्हॅलीड वरच पुढील संच मान्यता होणार असून आधार व्हँलीडची गती वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. शि.वि.अधिकारी भुजाडे सर यांनी सांगितले की,विद्यार्थी आधार मध्ये दुरुस्ती किंवा नवीन आधार काढण्याठी   कार्यालयामार्फत केंद्रप्रमुख मदत करतील तर दवंगे सर यांनी वरील मिशन या आठवड्यात पूर्ण करण्यात यावे असे आवाहन देखील केले.

 आजच्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम चे प्रास्ताविक केंद्रप्रमुख दिलीप गायकवाड, सुत्रसंचालन अर्चना पाटील तर आभार सतीश कोळी यांनी मानले