हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा

 


हिराबाई संचेती कन्या शाळा  व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला .केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी दिनांक 29 ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो.

विद्यार्थिनींमध्ये एकता आणि सर्वसमावेशकता ही मूल्ये रुजावी याकरिता रस्सीखेच, धावस्पर्धा ,कबड्डी, सांघिक खेळाचे आयोजन शाळेत करण्यात आले. प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ममता ताई पांडे, पर्यवेक्षिका सौ खडसे मॅडम ,ज्येष्ठ शिक्षिका वानखेडे मॅडम यांनी प्रतिमापूजन व क्रीडांगण पूजन केले.स्पर्धांचे उद्घाटन श्रीफळ फोडून श्री संचेती भाऊ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बक्षी मॅडम यांनी केले. विद्यार्थिनींना मेजर ध्यानचंद यांच्या जीवन चरित्राविषयी सौ गाढे मॅडम यांनी माहिती दिली. सौ खडसे मॅडम यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थिनी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या, आणि खेळाचा त्यांनी आनंद घेतला.राष्ट्रीय क्रीडा दिवस यशस्वीपणे साजरा करण्यासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.