काटी येथील विरपत्नी लिलाबाई हिवाळे यांचा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार

 


नांदुरा- तालुक्यातील ग्राम काटी येथे  स्वातंतत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मराठी प्राथमिक शाळा काटी व ग्रामपंचायत कार्यालय काटी  येथे विरपत्नी लिलाबाई हिवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  

        काटी येथील स्वतंत्र सेवावृत्त सैनिक कै.अजाबराव हिवाळे  यांच्या विर पत्नी लिलाबाई  अजाबराव हिवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी  स्वतंत्र सैनीक अजाबराव हिवाळे यांनी १९६५ चे युध्दातील  व जिवन प्रसंगातील काही प्रसंग डायरी मध्ये लिहून ठेवले होते. त्या डायरीचे गावातील  लहान मुलांना वाचन  करून त्याचे जिवन प्रसंग सांगण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. साधनाताई शरद हिवाळे यांच्या हस्ते विर पत्नी लिलीबाई हिवाळे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. 

       यावेळी पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य , ग्रामसेवक , शाळा समिती अध्यक्ष, सदस्य , शिक्षक ,  अंगणवाडी सेविका, मदतनीस विद्यार्थी व तरूण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.