सायंकाळी ६ वाजता सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न - इस्रोची माहिती
बंगळुरू : भारताची चांद्रयान ३ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून चांद्रयान- ३ हे अंतराळयान चंद्रावर उतरवण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. चांद्रयान- ३ येत्या बुधवारी (२३ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर लँडिंग करणार आहे, अशी
माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत ट्विटर वरून दिला.चांद्रयान- ३ हे चंद्रापासून अवघ्या तीन दिवसांच्या अंतरावर आहे. इस्रो चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास अमेरिका रशिया आणि चीननंतर हा पराक्रम करणारा भारत चौथा देश ठरेल.
भारताच्या चांद्रयान- ३ मोहिमेकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागले आहे. हे विक्रम लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागावर , उतरताना देशासह परदेशी नागरिकांनाही पाहता येणार आहे.
■ १७ ऑगस्ट २०२३ रोजी प्रोप्लशन मॉडेल विक्रम लँडरपासून विलग करण्यात आले. चांद्रयान- ३ हे एकूण ४० दिवसांचा प्रवासानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.