दि.06 जुलै
स्वर्गीय बी.के.कोकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य यशवंत सेनेच्या पदाधिकारी नियुकत्या राज्यभर सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून विदर्भाच्या प्रवेशद्वारे मलकापूर येथे घेण्यात आलेल्या एका छोटे खानी कार्यक्रमांमध्ये यशवंत सेनेच्या विदर्भ अध्यक्ष पदावर धनश्रीताई काटीकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तर जिल्हाध्यक्ष पदावर महादेव लटके यांना स्थान देण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे मा अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यावर असून ठीक ठिकाणी यशवंत सेनेच्या नवीन नियुक्ती देण्यात येत आहे. आज विदर्भ च्या प्रवेशद्वारी मलकापूर येथे आगमन झाले असता सर्वानुमते विदर्भ राज्याची जबाबदारी धनश्रीताई काटीकर पाटील यांना देण्यात आली तसेच जिल्हाध्यक्षपदावर करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे बाळासाहेब दोडतले, मा अध्यक्ष अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ महाराष्ट्र राज्य मंत्री, माणिकराव दांगडे पाटील प्रदेशाध्यक्ष, अण्णासाहेब रुपनवर प्रदेश सचिव, नितीन धायगुडे, या प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली.
याप्रसंगी कृष्णा सुशीर यांची विदर्भ संपर्कप्रमुख पदावर, अनिल पाचपोर यांची जिल्हा संघटक पदावर , संजय दिवनाले यांची तालुकाध्यक्ष पदावर , गणेश नेमाडे यांची शहर अध्यक्ष पदावर, काशिनाथ बोरसे यांची तालुका उपाध्यक्ष पदावर, अमोल पाचपोर यांची तालुका सदस्य पदावर, तर उमेश सुशीर यांची तालुका सचिव पदावर करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अप्रेसराजे तुपकरी, सय्यद ताहेर, प्रदीप इंगळे, मयूर लड्डा, यांनी परिश्रम घेतले.