खुलताबाद प्रतिनिधी
खुलताबाद तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या गावांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून, बौद्ध समाजातील भीमसैनिक अक्षय भालेराव याची निर्घुण हत्या जातीय दोषातून करणाऱ्या सर्व जातीवादी आरोपींना कठोर शासन करून सदरील खटला जलद गतीने न्यायालयात चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच अक्षय भालेराव यांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावे. व त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून पन्नास लाखाची मदत तत्काळ देण्यात यावी.
या मागणीचे निषेध निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या निषेध निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, तालुकाध्यक्ष फकीरराव भालेराव, तालुका सरचिटणीस भाऊराव गवळे, तालुका सचिव संजय जाधव, तालुका संघटक भास्कर खाजेकर, युवा नेते राहुल काळे, तालुका सहसल्लागार गजानन वाकळे, महिला तालुकाध्यक्ष राधा ताई शिंदे, महिला तालुका उपाध्यक्ष निर्मला शेवारे, महिला तालुका कार्याध्यक्ष उषाताई धनेधर, कविता शेवारे, तालुका सल्लागार अर्जुन भालेराव, शहर उपाध्यक्ष मिलिंद जाधव, शहर सचिव विकास बनकर, वेरूळ जि. प. सर्कल प्रमुख गुलाब सातदिवे, गदाना जि. प. सर्कल प्रमुख भाऊसाहेब बनकर, बोरगाव सर्कल प्रमुख वाल्मीक ढिवर, ज्येष्ठ नेते दगडू धनेधर, रमेश गरुड, अरुण गरुड, आदि संख्येने उपस्थित होते