शेळगाव(माळीवस्ती)येथील ग्रामस्थांच्या मागणीनंतर पुलाचे काम चालू


  

( किरण माने इंदापूर प्रतिनिधी )

       शेळगाव  : दिनांक १४ जून रोजी शेळगाव (माळीवस्ती)येथील निरा-डावा  कॅनलवरती असलेला पूल श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गचे  काम चालू असून रस्त्याच्या   कामासाठी मुरूम घेऊन जाणाऱ्या ट्रिपर (MH13CJ९१०२) कडून पुलाची एक बाजू कोसळली. या मध्ये कोणतीही दुर्घटना घडली नसून, या घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन तत्काळ  ग्रामस्थांनी वाहतूक बंद करून संबंधित काम करणाऱ्या कंपनीला  कळवले आणि पूल दुरुस्त करून देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.

      या घटनेमुळे कृष्णनगर,महादेव नगर,लमानवस्ती, चवरेवस्ती येथील शाळकरी मुले,शेतकरी,शेतमजूर, इत्यादी लोकांची गैरसोय होत आहे,हे लक्षात घेऊन  दिनांक १६ जून रोजी पुलाचे काम करण्यास संबंधित कंपनीने सुरुवात केली आहे.

       तसेच निराडावा कॅनलवरील असलेल्या पुलाची भविष्यात रुंदी वाढवून नवीन पूल बांधण्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाकडे मागणी केली आहे,अशी माहिती कर्मयोगी साखर कारखान्याची संचालक  राहुल जाधव यांनी दिली.

      यावेळी कर्मयोगीचे संचालक राहुल जाधव,यल्लाप्पा वाघमोडे, भारत बनकर,बबलू चवरे,शत्रुंजय जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर वाघमोडे,रवी जाधव व इतर ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.