किरण माने इंदापूर प्रतिनिधी)
दगडवाडी : (दिनांक १६) गुरुवार दिनांक १५ रोजी शंभू महादेव विद्यालय दगडवाडी, ता.इंदापूर,जि.पुणे येथील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम साजरा झाला.
सागर शिवाजी शिंदे ९५.२०%(प्रथम क्रमांक), तांबवे शुभम दत्तात्रय९१.८०%(द्वितीय क्रमांक)
आणि हर्षदा शरद रासकर ९१.८०%(तृतीय क्रमांक)
या यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व शंभू महादेव विद्यालयाचे संचालक श्री राहुल विठ्ठल जाधव तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि शंभू महादेव विद्यालयाचे अध्यक्ष श्री वसंत मोहोळकर तसेच दगडवाडी गावचे सरपंच संजय केसकर, दगडवाडी गावचे माजी सरपंच राजाभाऊ सूळ,नीरावांगी विकास सोसायटीचे चेअरमन सचिन रासकर, मनोज निंबाळकर तसेच स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामदास नाना रासकर,निरंजन रासकर आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदट मॅडम आणि विद्यालयाचे सर्व शिक्षक स्टाफ यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.