मलकापूर नजीक भीषण अपघात; आयशर व ट्रॅव्हल्सची धडक, चार ठार

 


    बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नजीक आज झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. यामुळे मलकापूर परिसर हादरला आहे.या घटनेचा विस्तृत तपशील प्राप्त झाला नाही. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मुक्ताई नगर मार्गावर जगगु मामा धाब्यानजीक ही दुर्घटना घडली. आयशर व ट्रॅव्हल्स भरवेगात एकमेकांना धडकले. यामुळे चौघे जण जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. .

याबाबत सविस्तर वृत्त असे की नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास सुरवात होऊन नागपूरपर्यंत जात असलेली लक्झरीचे टायर पंचर झाल्याने पंचर दुरुस्तीसाठी रस्त्याकडेला थांबलेल्या लक्झरी क्रमांक mp 18 bg ८३५१ मागच्या बाजूने जोरदार धडक दिल्याने लक्झरी समोर उभे असलेले राजू भाई उर्फ हरी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर भडगाव आयशर हे रोडच्या विरुद्ध दिशेला जाऊन त्या ठिकाणी उभी असलेली गर्भवती महिला सौ अंजली आकाश जाधव वय 27 वर्ष हीलासुद्धा धडक लागल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला तर आयशर चालक किरण खंडू भदाणे व 42 वर्ष व त्याच्यासोबत असलेला सिताराम उर्फ आप्पा राम बरेल वय 55 वर्ष दोघे राहणार अमराळ तालुका सिंदखेडराजा यांचा जागीच मृत्यू झाला

घटनेची माहिती मिळताच मलकापूर स्टेशनचे पीएसआय नरेंद्र ठाकूर पी अ.देवानंद कोळी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आला

 हे वृत्त लिहिपर्यंत पोलीस कार्यवाही सुरू होती. याबाबत नदीम खान नईम खान पठाण वय 34वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 279 304 (अ)283 भादविसह कलम 184 134 187 गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा प्राथमिक तपास पीएसआय नरेंद्र ठाकूर यांनी केला तर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाये करीत आहेत