वैजापूर शहारातील अपघातावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनेसाठी भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्यांना घेराव

 


प्रतिनिधी सागर मोटे

- छत्रपती संभाजी नगर पासून नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वैजापूर शहरातील जीवन गंगा सोसायटी, सेंट मोनिका स्कूल, म्हसोबा चौक, महाराणा प्रताप चौक पंचायत समिती कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा परिसर, मुख्य चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा परिसर, नवीन भाजी मंडई, येवला नाका चौक, विनायकराव पाटील महाविद्यालय या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या. ठिकाणांवर वारंवार अपघात होऊन कित्येक नागरिकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे त्यातही जीवन गंगा सोसायटी येथील राष्ट्रीय महामार्गावर दिवसाआड अपघाताचा थरारक सतत होतांना दिसते आजपर्यंत जवळपास २१ लहान मोठे अपघात याठिकाणी घडले असून काही दिवसांपूर्वीच झालेल्या मोटारसायकल स्वाराचा थरकाप उडवणारा अपघात घडला त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा प्राधिकरणाकडे या रस्त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी विनंती करण्यात आली होती त्यामुळेच स्थळ पाहणीसाठी आलेल्या या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला घेराव घालून आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती आणि काय उपाययोजना करता येईल हे प्रा.डॉ.आबासाहेब कसबे, कृष्णा मगर, शांताराम मगर, राजू मतसागर,मयुर डांगे, संदीप चोथे, प्रज्ञा चव्हाण, वंदना इंगळे, अजय काळे, अशोक गायकवाड, योगेश इंगळे, यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना घेराव घालून या रस्त्यावर होणाऱ्या अपघाताची माहिती दिली व त्यासाठी प्राधिकरणाकडून आवश्यक कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली इलेक्ट्रिक सिंगनल, व्हाईट ब्रेकरच्या पट्टी ची उंची वाढवणे, दिशादर्शक फलक लावणे या मागण्या करण्यात आल्या यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे ॲथॉरिटी इंजिनिअर कांबळे साहेब, माजिद साहेब, जाधव साहेब, गंगामाई कन्स्ट्रक्शन चे सावंत यांची उपस्थिती होती -------------------------------------------------------------------------------- गंगामाई कन्स्ट्रक्शन चे सावंत साहेब यांनी तात्काळ जीवन गंगा सोसायटी गेटसमोरील महामार्गावर इलेक्ट्रिक सिंगनल यंत्रणा, व्हाईट ब्रेकरच्या पट्टी ची उंची वाढवणे दिशादर्शक फलक येत्या दोन दिवसांत लावण्याचे आश्वासन दिले.