प्रतिनिधी ( राजेंद्र सूर्यवंशी)
श्रीरामपूर तालुका व शहर मधले गुटखा ,जुगार अड्डे ,मटका ,मन्ना पत्ता ,बिंगो ,सोरट असे अनेक अवैध धंदे बंद करण्याची मागणी प्रशासन अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने करण्यात आली होती पण वारंवार निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्यामुळे आर,पी,आय (आंबेडकर) व भीमगर्जना सामाजिक संघटना च्या वतीने लक्षवेधी एकदिवशी उपोषण करण्यात आले यावेळी भीम गर्जना सामाजिक संघटने चे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज भाई पठाण, तालुकाध्यक्ष रफिक शहा, तालुका उपाध्यक्ष सोनू शेख, तालुका संघटक मुनाफ पिंजारी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) युवा जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे, तालुकाध्यक्ष श्रीकांत महांकाळे, युवा तालुकाध्यक्ष विकास जगधने हे सर्व एक दिवशी उपोषण साठी उपस्थित होते, व अनेक संघटनेच्या माध्यमातून यांना जाहीर पाठिंबा दिला