ठाणा गांवातील नुराणी मज्जीत मधील चोरी उघड व चोरटा जेरबंद: फरदापुर पोलीस स्टेशनचे स.पो.नी भरत मोरे यांची धडाकेबाज कारवाई


प्रतिनिधी रईस शेख,

मा. पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील चोरी करणा-याचा चोरटयांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याबाबत सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत.

यावरुन सिल्लोड उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कुमार कोल्हे साहेब यांनी अशा गुन्हयांचा जलद गतीने तपास करण्याबाबत मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकीस आणुन अशा घटनांना आळा बसणे कामी मार्गदर्शन केले. यावरुन फर्दापुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भरत मोरे हे त्यांचे तपास पथकासह फर्दापूर शिवारातील ठाणा गांवामध्ये गु.र.नं. 64/2023 कलम 379 मध्ये फिर्यादी नामे अमजद उस्मान पठाण वय 30 व्यवसाय शेती व नुराणी मज्जीद ठाणा येथील अध्यक्ष रा. ठाणा ता. सोयगांव यांचे फिर्यादीवरुन 23000 रुपये किंमतीची ऑटोमॅटीक नमाज टायमिंग इंडीकेटर असलेली इलेक्ट्रोनिक घडयाळ अब्दुल्लाह सलात कर्पणीची व त्याच्यासोबत 6000 रुपये किमतीचे केंट केएसएल कंपणीचे वेट ऍन्ड ड्राय व्हॅक्युम क्लीनर सिल्वर येलो रंगांचे चोरी झालेली आहे म्हणुन गुन्हा रजिस्टरी दाखल केला त्यांचा तपास मध्ये सपोनि भरत मोरे व त्यांचे पोलीस पथकास गोपणीय बातमी मिळाली की, धावडा ता. भोकरधन जि. जालना येथील एक इसम नामे शेख जाकिर शेख आशक हुसेन वय 33 वर्षे रा. धावडा हयाने त्यांचे सासरी ठाणा या गांवामध्ये वास्तव्याच्या दरम्यान चोरी केली होती असी बातमी मिळतांच सपोनि भरत मोरे यांनी एक तपास पथक धावडा ता. भोकरधन जि.जालना येथे पाठविले असता वरील इसमास अत्यंत चालाखीने ताब्यात घेवुन त्यांचे कडुन खालील वर्णणांचा 100 टक्के मुददेमाल जप्त करण्यात आला त्यांचे वर्णण खालील प्रमाणे...



(1) 23000 रुपये किंमतीची ऑटोमॅटीक नमाज टायमिंग इंडीकेटर असलेली इलेक्ट्रोनिक घडयाळ अब्दुल्लाह सलात कपंणीची

2) 6000 रुपये किमतीचे केंट केएसएल कंपणीचे वेट ऍन्ड ड्राय व्हॅक्युम क्लीनर सिल्वर व येलो रंगांचे एकुन 29000 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सध्या आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असुन त्यांचे कडे सदर गुन्हयात त्यांचे आनखी कोणी साथीदार आहेत काय तसेच त्यांने सदर ची चोरी करुन वरील मुदद्देमाल कोणाला विकला होता काय यांचा अधिक तपास करणे बाकी आहे.


नमुद कार्यवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री मनिष कलवानिया, अपर पोलीस अधिक्षक श्री. सुनिल लांजेवार, उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. दिनेशकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शणाखाली सपोनि भरत मोरे, पोहेकॉ मसुद अब्दुल तडवी, पोना निलेश लोखंडे, पोकों, पंकज व्यवहारे, पो. कॉ. प्रकाश कोळी, योगेश कोळी, भरत कोळी, सतिश हिवाळे, प्रदिप बेदरकर, मपोकों, कल्पना चाथे, कविता चाथे यांनी मिळून केलेली आहे.