अकोला येथे मुक्ताईनगर पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीची वस्तीगृहात गळफास घेवून आत्महत्या

            


      मुक्ताईनगर अकोला शहरातील शास्त्री नगर भागात असणाऱ्या मुलीच्या वस्तीगृहात एका १७ वर्षीय मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटना २५ रोजी रात्री उशिरा ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आत्महत्या केलेली मुलगी मूळ जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील रहिवासी असून एका पोलीस कर्मचाऱ्यांची मुलगी आहे. तिच्या आत्महत्याच नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही.

            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील शास्त्रीनगर भागात मुलींचे वस्तीगृह आहे. या वस्तीगृहात राहणारे एका १७ वर्षे मुलीने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटने संदर्भात सिव्हिल लाईन पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं अन् घटनास्थळाचा पंचनामा तिचा मृतदेह करून शवविच्छेदनासाठी पातील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

        अकोला शहरातील शास्त्रीनगर भागात मुलींचे वस्तीगृह आहे. या वस्तीगृहात राहणारे एका १७ वर्षे मुलीने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याघटने संदर्भात सिव्हिल लाईन पोलिसांना माहिती देतात पोलिसांनी घटनास्थळ गाठलं घटनास्थळाचा पंचनामा करून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. लक्ष्मीपार्वती चंद्रकात बोदडे असं आत्महत्या करण्यात आलेल्या १७ वर्षीय मुलीच नाव असून ती मुक्ताईनगर येथील रहिवासी आहे. तिचे वडील चंद्रकांत बोदडे हे पोलीस दलात कार्यरत आहेत. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे करीत आहेत. दरम्यान या मुलीचं आत्महत्याच अद्याप मूळ कारण समोर आलं नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती, असे सांगण्यात येत आहे. रविवारी रात्री १० वाजले तरीही लक्ष्मीपार्वती हे जेवणासाठी आली नव्हती, तिच्या मैत्रिणींनी देखील तिला फोन करून संपर्क केला असता मात्र तिच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर स्वयंपाक करणारी महिला आणि तिच्या मैत्रिणी तिला बोलवण्यासाठी वस्तीगृहातीलच तिच्या रूमवर पोहचल्या.

         मात्र तिच्या खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता, कित्येकदा दरवाजातून तिला हाक दिल्या तरीही त्यावर कुठलाही प्रतिसाद नव्हता. काही तरुणींनी खिडकीतून डोकावून पाहिलं असता त्यांना तिने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. खोलीच्या दरवाजाच्या पाच फुटाच्या अंतरावर कडीकोड्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे खोलीचा दरवाजा तोडणं अशक्य होतं. यासाठी पोलिसांनी मजूर वर्गांना बोलावून रूमच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तिचा मृतदेह मध्यरात्रीनंतर अकोल्याचे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर वस्तीगृहात प्रचंड आरडा-ओरड झाला. दरम्यान लक्ष्मी पार्वती ही हाताने अपंग असून अकोल्यात नीट परीक्षेचीसाठी शिकवणी क्लाससाठी आली होती. राहण्यासाठी वस्तीगृहात निवडले, या वस्तीगृहात एकत्रित सुमारे ३७ मुली आहेत. दरम्यान तिची रूम पार्टनर असलेली मुलगी तिच्या घरी लग्न समारंभ असल्यामुळे गेल्या सात दिवसांपासून गावी आहे.