भीतीचे वातावरण, चोपड्यात वैभव ज्वेलर्स शटर वाकून फोडले चोरींचे धाडसत्र सुरूच अवघ्या महिन्याभरात पाचवी धाडसी चोरी ; पोलिसांना चोरांचे आव्हानच



चोपडा प्रतिनिधी मिलिंद वाणी

     शहरात मागील महिनाभरापासून चोरीचे प्रमाण खूपच वाढले आहे आजही मेन रोडवरील सोनम इलेक्ट्रॉनिक्स च्या बाजूला असलेले वैभव ज्वेलर्स या दुकानाचे शटर वाकून चोरट्यांनी चोरी केली यामुळे शहरात व्यापाऱ्यांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अवघ्या महिन्याभरात पाचवी धाडसी चोरी झाल्याने चोरटे पोलिसांना आव्हान तर नाही करत ना असे चित्र समोर येत आहे. 

    याबाबत सविस्तर असे की मेन रोडवरील सोनम इलेक्ट्रॉनिक च्या समोरील वैभव ज्वेलर्स या दुकानाचे शटर वाकून रात्रीच्या तीन साडेतीनच्या सुमारास चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे चोरटे हे अज्ञात असले तरी मोटर सायकल वरून येत असतात व आपला हात साफ करून जात आहे नुकत्याच समर्थ ट्रेडर्स वर झालेल्या चोरीचेच चोरटे आज तेज चोरटे वैभव ज्वेलर्स च्या सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये आलेले आहे त्यामुळे परिसरात व शहरात एकच चर्चा आहे की चोर पोलिसांना सापडत नसल्याने चोरटे आव्हान तर नाही देत ना असा प्रश्न सामान्य जनतेत निर्माण होत आहे वैभव ज्वेलर्स चे मालक हे रात्री चांदी व सोने आपल्या घरी घेऊन जात असल्यामुळे किरकोळ वीस हजार रुपयांच्या जवळपास चोरी झाल्याचे समजते परंतु रोज एक छोट्या मोठ्या चोऱ्या सुरू असल्याने सामान्य जनतेत भीतीचे वातावरण पसरलेले आहेत मागील गुन्ह्याच्या तपास होत नाही तोपर्यंतच दुसरी चोरी करून चोरटे पसार होत आहे वैभव ज्वेलर्स वर आलेले चोरटे हे मोटरसायकलने आले असता चोरटे हे अवघ्या 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरातले असावेत असा संशय पोलीस निरीक्षक चोपडा शहर चे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी व्यक्त केला त्या चोरट्याच्या गॅंग मध्ये एक स्थानिक ही इसम असावा असाही संशय आम्हाला बळकवत आहे लवकरच आम्ही त्यांच्या बंदोबस्त करू असेही पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी व्यक्त केला व व्यापाऱ्यांना आवाहन करत त्यांनी म्हटले की पंधरा-वीस दुकानं मिळून एक गार्ड ठेवणे आवश्यक होऊन गेलेले त्या नंतर प्रत्येकाच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक होऊन गेलेले आहेत तरीही व्यापाऱ्यांनी कोणतीही भीती न बागळता आम्ही एक दिवशी चोरट्यांना जेलमध्ये टाकूच असेही आश्वासन त्यांनी दिले यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांनीही वैभव ज्वेलर्स चे पाहणी केली त्यानीही चिंता व्यक्त केली की चोरीचे प्रमाण वाढले आहे यासाठी आपण काय करू शकतो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे चोरीचे सत्र वाढल्याने त्यांनी चिंता व्यक्त केले असली तरी यावर उपाय काय यांच्या विचार सर्वांनी करायलाच हवा. छोट्या मोठया चोऱ्या रोजच सुरू असल्याने सामान्य जनता मात्र भीतीत जीवन जगत आहे. पोलीस निरीक्षक के के पाटील म्हणाले की, पोलिसांचा मनुष्यबळ कमी पडत