प्रतिनिधी मिलिंद वाणी
नांदेड जिल्ह्यातील भोडार गावातील अक्षय भालेराव यांची जातीय द्वेष भावनेतुन निर्गुण हत्या करण्यात आली असून तरी जातीयवादी मानसिकतेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी तसेच त्यांचे सीडीआर काढून त्यांचे संपर्क च्या व्यक्तीवर पण कारवाई झाली पाहिजे मारेकऱ्यांना पाठीशी घालण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवरही कठोर कारवाई करण्यात यावी.एकमेव असा हा व्यक्ती कमावणारा होता तरी शासनाने त्याला आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एका जणाला शासकीय नोकरी द्यावी अशी चोपडा तालुक्यातील निळे निशान सामाजिक संघटना चोपडा,तालुका अध्यक्ष महिला मंच अनिताताई बाविस्कर यांनी व चोपडा शहर व तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.