श्रीरामपूर परिसरात व्यापाऱ्याला लुटले



प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी 

श्रीरामपुर टिळक नगर येथील रांजणखोल चौकात रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकी अडून चाकूचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याला लुटले सराईत आरोपी रईस शेरखान पठाण वय(२८, रा. टिळकनगर,) दुसरा आरोपी रोहित सोपान रामटेक वय(३१, रा. रांजणखोल) याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार व्यापारी बाळकृष्ण गोविंद खोसे(वय६४, रा. खोसे वस्ती बेलापूर चौक कोल्हापूर) यांनी रविवारी दिनांक १८, ०६ ,२०२३ सकाळी सुमारे अकरा वाजेच्या आसपास दुकानात लागणारी मटेरियल घेण्यासाठी २० हजार रुपये घेऊन गेले व जुने ग्राहक प्रशांत डांगे तालुका राहता यांच्याकडून उधारीचे पैसे आणण्यासाठी मोटरसायकलवर तालुका,राहाता या ठिकाणी गेले 

    येते वेळेस दत्तनगर टिळक नगर रांजणखोल या परिसरात या दोघा आरोपींनी गाडी आडवी लावून चाकूचा धाक दाखवून १२ ग्राम वजनाची ७०हजार रुपयाची सोन्याची साखळी वीस हजार रुपये रोख रक्कम दहा हजार किमतीचे विवो कंपनीचा मोबाईल असे एकूण एक लाख रुपयाचे मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या यांच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे,पो,ना. रामेश्वर ढोकणे, पो,ना. रघुनाथ कारखेले पो,कॉ. मच्छिंद्र कातखडे,पो,कॉ. प्रमोद जाधव, पो,कॉ. गणेश गावडे, पो,कॉ. आकाश भैरट, पो,कॉ. राहुल नरवडे,पो,कॉ. गौतम लगड  यांनी खूप परिश्रमाने आरोपींना जेल बंद केलेले आहे पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक देवरे करीत आहे