देवळा:- राकेश आहेर
मुंबई आग्रा महामार्गावरील उमराणे गावाजवळील युपी प्रतापगड धाब्याजवळ दि.१४ रोजी रात्री नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा गहू व तांदूळ घेऊन जाणारा ट्रक क्रमांक (एम.एच १२. एफ. सी. ५८४४) पकडण्यात आला असून यात ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत ३ लाख ६० हजार किमतीचे सुमारे २४६ गोणी तांदूळ (५० किलो प्रति कट्टे) व ३७ हजार किमतीचे सुमारे ३० गोणी गहु व ८ लाख रुपये किमतीचा मालट्रक असा एकूण ११ लाख ९७ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तर विजय देवरे (उमराणे) ता. देवळा व योगेश माणिक देवरे वाहनचालक (खुंटेवाडी) या दोघांवर पुरवठा निरीक्षक ज्योती कपाले यांच्या फिर्यादीवरून जीवनावश्यक कायद्यानुसार देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे व त्यांचे सहकारी करत आहेत.
फोटो - बातमी सोबत दोन फोटो पाठवतं आहे