(गुलाब वाघ, गंगापूर तालुका प्रतिनिधी )
गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव जिल्हा परिषद गटातील सर्वच गावात झालेल्या वादळी वाऱ्याने विजेच्या मुख्य लाईन सह कृषी पंपाचा गावठाणचा,पाणीपुरवठाच्या,विज पुरवठा खंडित झाल्याने सर्वच गावातील नागरिकांना,शेतवस्तीवर वास्तव्यास असणाऱ्या शेतकऱ्यांना, सर्व जनावरांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झाला असून वेळोवेळी आपल्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना विजपुरवठा सुरळीत करणेसाठी संपर्क करत असतांना शेतकरी नागरिकांकडून पैशाची मागणी करत खाजगी गुत्तेदाराकडून काम करून घेण्याचा सल्ला देण्याचा सर्रास प्रकार सुरु झाला असून ऐन संकटात शेतकरी, नागरिकांना “दुष्काळात तेरावा महिना” असा प्रसंग निर्माण झाला आहे.
करिता तात्काळ शिल्लेगाव जिल्हा परिषद गटातील सर्वच गावातील खंडित वीजपुरवठा आपल्या विभागामार्फत शेतकरी,नागरिकांना कोणताही आर्थिक भुर्दंड न देता सुरळीत न केल्यास सिद्धनाथ वाडगाव येथील उपकेंद्रावर शेतकरी नागरिकांचे “हल्लाबोल” आंदोलन बुधवार 14 जूनला करण्याचा इशारा माजी अर्थ बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव यांनी लेखी निवेदनद्वारे दिला आहे.