कंधारेवाडी येथील ज्योती कंधारे' आता होणार डॉक्टर.

 प्रतिनिधी:- मारोती जिनके
दि.16/06/2023 

कंधार. (जि. नांदेड) कंधार तालुक्यातील कंधारेवाडी येथील अंकुश काशिनाथ कंधारे या अल्प भूधारक शेतकऱ्याची कन्या ज्योती कंधारे हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसभर शेतात काम करून रात्री चार पाच तास नीट परीक्षेचा अभ्यास करत गुण घेतले. नीट परीक्षेत ७२० पैकी 5६३ गुण घेऊन देशात ५३६२५ वा क्रमांक मिळवला. डॉक्टर होण्याची पहिली पायरी तिने चांगल्या गुणांनी पार केली.

विशेष असून ती गावातली पहिली डॉक्टर ठरणार आहे.

ज्योतीने दहावीपर्यंतचे शिक्षण कंधार येथील महात्मा फुले विद्यालयात घेतले. दहावीला तिला 90 टक्के मिळाले. ११ वी १२ तिने कंधारेवाडी येथीलच विद्यासागर व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत केली. घरीच अभ्यास केला. शिवाय आईवडिलांना शेतीकामात मदत करायची. बाहेरून कॉलेज करीत बारावीच्या परीक्षेत तिने ६८ टक्के

कंधारे यांच्या कुटुंबात अद्यापपर्यंत कुणीही शासकीय नोकरीला नाही व अंकुश कंधारे यांचे शिक्षण ११ वीपर्यंतच झाले. पुढे त्यांची
शिकण्याची इच्छा होती; पण परिस्थिती बिकट असल्यामुळे पुढील शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यांचा मुलगा अर्थात ज्योतीचा भाऊ हा दहावीनंतर आयटीआय करून एका कंपनीत दहा हजार पगारावर काम करतोय.
    क्लास न लावता घरीच ज्योतीने नीटचा अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात तिने चांगले गुण घेतले. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती आता पात्र ठरली आहे.