मनमाड प्रतिनीधी सतिश सिंह परदेशी
मनमाड शहरात आरोग्य क्षेत्रात २००६ पासून 17 वर्ष अविरत पणे रुग्णसेवा देणारे आनंद सेवा केंद्राला *जीवनरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या 15 वर्षापासून सातत्याने एक ठिकाण एक दिवस एक रक्तपेढी असा अनोखा रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन नेहमी आपला मागील विक्रम तोडणाऱ्या आनंद सेवा केंद्राला अर्पण रक्तपेढीच्या मानाचा जीवन रक्षक पुरस्कारअर्पण रक्तपेढी नासिक द्वारे प्रदान करण्यात आला. रक्तदान क्षेत्रातील सातत्याने अतुलनीय निस्वार्थी कार्य करणाऱ्या संस्था ना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.मनमाड शहरात आरोग्य व रुग्ण सेवेत आपलो वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आनंद सेवा केंद्रा ची ही निवड मनमाड शहराला अभिमानास्पद आहे सन २००६ साली आरोग्य सेवे साठी स्थापन झालेल्या आनंद सेवा केंद्रा तर्फे सन २००८ साला पासून सलग १५ वर्ष भगवान महावीर यांचे जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते गेल्या १५ वर्षात या शिबिराच्या माध्यमातून आनंद सेवा केंद्रा ने *२२००* पेक्षा ही जास्त रक्त पिशव्या संकलित केल्या आहेत. संपूर्ण विश्वा वर आलेल्या महाभयंकर कोविड -१९च्या संकट काळात सन २०२० मध्ये १६५ सन २०२१ मध्ये १५४ तर यंदा १७१ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.आणि गत १४ वर्षात आनंद सेवा केंद्रा च्या माध्यमातून हजारो रुग्णांना अति तातडी काळात ही रक्तदान संबंधित विशेष मदत करण्यात आली.
अर्पण रक्तपेढी तर्फे नासिक येथील मध्ये आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये मविप्र चे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे , यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठयाचे कुलगुरू डॉ प्रा संजीवजी सोनवणे, सुप्रसिद्ध गजल गायक घनश्यामजी वासवाणी, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ काकतकर,अर्पण रक्तपेढी चे सर्वोसर्वा प्रमुख नंदकिशोरजी ताथेड,आणि मान्यवरांच्या हस्ते *जीवनरक्षक स्मृती चिन्ह प्रमाणपत्र देऊन हा गौरव करण्यात आला आनंद सेवा केंद्रा च्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात आनंद सेवा केंद्रा चे अध्यक्ष *कल्पेश बेदमुथा, उपाध्यक्ष योगेश भंडारी,दीपक शर्मा, अमोल देव,ललित धांदल,विनय सोनवणे,अनुप पांडे चेतन संकलेचा, नितिन अहिरराव, , संजय गांधी,प्रमोद भाबड ,यांनी स्वीकारला ह्या पुरस्कार चे खरे मानकरी आनंद सेवा केंद्रा च्या *रक्तदान चळवळीत नियमितपणे रक्तदान करणारे रक्तदाते च आहेत म्हणून हा पुरस्कार त्या निस्वार्थी रक्तदात्या ना समर्पित असून सर्वाच्या सहकार्य ने हा रुग्ण सेवेचा यज्ञ पुढे ही सुरु राहील* असे याप्रसंगी कल्पेश बेदमुथा व योगेश भंडारी यांनी सांगितले ह्या पुरस्कारा मुळे *आनंद सेवा केंद्राचे* चे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.