प्रतिनिधी साक्री :श्री संजय बच्छाव.
धुळे शहरातील साक्री रोडवरील मोगलाई भागात एका धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनाचा आला त्यामुळे सकाळी सहा वाजेपासून नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र असल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांच्यासह शहर पोलिसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना शांततेचे आव्हान केले या भागातील नगरसेवक तथा स्थायी समितीच्या सभापती किरण कुले लेवार सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलवार आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनीही नागरिकांची समजूत काढली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून बंदोबस्त तैनात केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या धुळे शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस अधीक्षक श्री संजय बारकोड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, मोगलाई भागातील एका धार्मिक स्थळी मूर्तीची विटंबना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींवर त्वरित गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवा पसरवू नये असे आवाहन श्री संजय बारकुंड साहेब यांनी केले आहे. दरम्यान धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.