प्रतिनिधी साक्री :श्री संजय कालेश्वर बच्छाव.
शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता डोंगर बहिरम यांनी आज रोजी केली.
दहिवेल (बोधगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री डोंगरू बहिरम यांनी दिनांक 31 मे रोजी साक्री येथे तहसीलदारांना निवेदन दिले. त्या निवेदनात त्यांनी असे म्हटले की आजच्या परिस्थितीला शेतकरी हा फार हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या कोणताच शेती मालाला चांगला भाव मिळत नाही आहे. कांदे, टमाटे, शेतकरी रस्त्यावर फेकून येत आहे. सोयाबीनला सुद्धा चांगला भाव नाही कपाशीला कमी भाव आहे त्यामुळे तीही आज घरात पडून आहे अशा अनेक अडचणीत शेतकरी सापडला आहे. तर दुसरीकडे खते बी बियाणे यांचे रेट चार पटीने वाढले आहेत. आणि मजुरीचे भाव तीनशेच्या पार झाली आहे. अशा अवकाळी, दुष्काळी, नैसर्गिक, परिस्थितीवर मात करत शेतकरी आपला मालपिकवतो व त्याला कवडीमोल भाव मिळतो. अक्षरशा पिकाला लागलेला खर्चसुद्धा निघत नाही एखाद्या वेळेस तर शेतकरी आपला पिकवलेला कांदा, टमाटा, रस्त्यावर फेकून येतो. त्यामुळे शेतकऱ्याला आता असे प्रश्न चिन्ह निर्माण होते की शेतात पिकवायचे तरी काय आता. तसेच आता पावसाळी पेरणीसाठी बी बियाणे खते आणायचे तरी कुठून? अशा परिस्थितीत शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आता गांजा लावण्याची परवानगी द्यावी असे डोंगर बहिरम यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तहसीलदार साहेबांना निवेदन पुढील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
(1) श्री डोंगरजी जिभाऊ बहिरम
(2) श्री लक्ष्मण सूर्यवंशी, बाबूलाल सूर्यवंशी, तुषार साबळे, गबाजी साबळे, व बारकू शिवलाल ठाकरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.