शेळगाव : दि १ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास इंदापूर बारामती पालखी महामार्गावरती शेळगाव हद्दीमध्ये एका कारला समोरून येणाऱ्या अनोळखी चार चाकी गाडीने धडक दिली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड वरून बारामती कडे लग्न सोहळ्यासाठी जात असलेल्या (एम एच ११ ए डब्ल्यू ९४१९) या कारला समोरून येणाऱ्या अनोळखी फोरव्हीलर गाडीने जोरदार धडक दिली आहे. यामध्ये गणेश भड आणि धनंजय मोरे (राहणार रवळस,ता बीड,जि बीड) हे गंभीर जखमी झाले आहेत. (एम एच ११ ए डब्ल्यू ९४१९) ही कार शेळगाव हद्दीमधील पुलावरून ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडला असे दिसून आले.
यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत अपघाताची गंभीर परिस्थिती पाहून ॲम्बुलन्स बोलून स्थानिक लोकांच्या मदतीने
अपघातग्रस्तांना ॲम्बुलन्स मध्ये टाकून पुढील उपचारासाठी नीलकंठेश्वर हॉस्पिटल जंक्शन येथे हलवण्यात आले.
यावेळी बारामती इंदापूर महामार्गावर गाड्यांच्या लांब रांगा लागलेल्या असताना वालचंदनगर पोलिसांनी स्थानिकां लोकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली.