नदी पात्रात पाणी सोडण्यास मंजुरी


 प्रतिनिधी साक्री श्री संजय बच्छाव

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री चंद्रजीत भामरे यांच्या प्रयत्नाने बुराई नदी प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेसध्या बुराई नदी तीरावरील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे.या स्थितीचे  गांभीर्या बघुन धुळे जिल्ह्याचे भाजपा उपाध्यक्ष मा.भैयासहेब चंद्रजित भामरे यांनी धुळे जिल्ह्याचे खासदार मा. डॉ. सुभाषजी भामरे यांच्याकडे बूराई नदी प्रकल्पातून पाणी सोडण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता.याची तात्काळ दखल घेऊन  खासदार साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबत त्वरित निर्णय घेण्यास सांगितले

त्यानुसार जिल्हाधिकारी साहेबांनी परिस्थितीचा आढावा घेत योग्य ती कार्यवाही करून आज रोजी नदी पात्रात पाणी सोडण्यास मंजुरी दिली. यामुळे दुसाणे बळसाणे, सतमाने,कढरे व रेवडी ह्या गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.याप्रसंगी मा.भैयासाहेब चंद्रजित भामरे,दूसाण्याचे प.स.सदस्य रविंद्र आण्णा,बळसाणे गावाचे सरपंच प्रा. ज्ञानेश्वर हालोरे सर, मा.प.स. सदस्य सरदार पाटील, उपसरपंच मोतीलाल आबा खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद धनुरे, दंगल हालोरे, रावसाहेब हालोरे, निंबा धनुरे, धनसुखलाल ढिवरे, सतमाणे मा.प.स श्री. निंबा पाटील तसेच आनंदा पाटील, संजय पाटील, मधुकर पाटील, लक्ष्मण पाटील, भटू पाटील, रेवाडीचे सरपंच बापू पवार तसेच बापू मालचे, सरदार आखाडे आदी उपस्थित होते.