मलकापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
सायंदैनिक अहिल्याराज च्या वर्धापन विशेष आवृत्तीचे विमोचनपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सायंदैनिक अहिल्याराज परिवार, व पत्रकार बांधवांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून याप्रसंगी सायंदैनिक अहिल्याराज च्या वर्धापन दिनाच्या अंकाचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. प्रशांत माने अस्थिरोग तज्ञ, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भाग्यश्री माने मॅडम दंतचिकित्सक, धनश्रीताई काटीकर पाटील मुख्य संपादक दैनिक अहिल्याराज तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, हनुमान जगताप ज्येष्ठ पत्रकार, वीरसिंह दादा राजपूत ज्येष्ठ पत्रकार, उल्हासभाई शेगोकार जेष्ठ पत्रकार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून नथुजी हीवराळे, गौरव खरे, समाधान सुरवाडे, शेख जमील पत्रकार, सय्यद ताहेर, निलेश चोपडे, महादेव लटके, संतोष वानखेडे, विनयभाऊ काळे यांची उपस्थिती लाभली असून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मयूर लड्डा, प्रदीप इंगळे, प्रमोद हिवराळे,प्रा. प्रकाश थाते यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत देऊन आले यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वप्निलभाऊ अकोटकर यांनी केले.