प्रमिलाताई चिमकर व शितलताई इंगळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान



 

आज दिनांक 31 मे रोजी तालुक्यातील धरणगाव ग्रामपंचायत च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती साजरी करण्यात आले. तर यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

              यावेळी सर्वप्रथम धरणगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.संगीताताई प्रमोद पाटील ग्रा सदस्य सौ.अर्चनाताई पाचपोर यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित धरणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच अमित झनके ग्रामविकास अधिकारी निनाजी झाल्टे, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
          तर यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल नव्याने सुरू करण्यात आलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार हा धरणगाव येथील प्रमिलाताई चिमकर आणि शितलताई इंगळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्र शासन पुरस्काराने धरणगाव ग्रामपंचायतच्या वतीने शाल श्रीफळ प्रशस्ती पत्र व मानधन देऊन गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ संगीता ताई पाटील उपसरपंच, अमित भाऊ झनके, ग्रामविकास अधिकारी निनाजी झाल्टे यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला यावेळी गावातील ग्रामस्थ व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते